* मायच्या पोटातला जीव गुदमरतोय – हा विकास नाही, विनाशाचा ‘रेड अलर्ट’ आहे*
‘अकोल्याचा इशारा’ हॉस्पिटलच्या दारात होता.
*’प्रदूषणाचा इशारा’ आता आईच्या गर्भाशयात आहे.*
१२ वर्षांचा ऐतिहासिक कारभार
१. *’उज्ज्वला’चा जुमला: ‘Give It Up’ म्हणून गॅस सरेंडर करून घेतला. गरीबांना१२ सिलिंडरचे ४ केले. सर्वसामान्यांना ११००चा दर. . गरीब माय पुन्हा चुलीवर.आली.
२. *विकासाच्या नावाखाली विनाश:* शक्तीपीठसाठी १२ लाख झाडं कापणार. इमले-रस्ते बांधले, पण मायला श्वासासाठी ऑक्सिजन नाही. इतकं प्रदुषण वाढलय दिल्लीत.
३. *पुढची पिढी धोक्यात:* चुलीचा धूर + तोडलेली झाडं + कारखान्याचा धूर = AQI 450. या ‘प्रदूषणामुळे पोटातल्या गर्भाला धोका निर्माण झाल्याची माहिती समोर ये’ हा ‘रेड अलर्ट’ आहे.*
*४परखड सत्यं:*
१. *’समिती’ नव्हे, ‘कृती’ हवी:* गर्भाच्या सुरक्षेसाठी ‘मिशन’ कुठंय?
२. *हा ‘जगण्याचा ‘हक्क’ आहे:* गर्भाला ‘ऑक्सिजन’ मिळावा हे ‘संविधान’ आहे.
३. *सामान्य कुटुंबाची ‘दुहेरी काळजी’:* ‘मोफत सोनोग्राफी’ नाही, ‘पौष्टिक आहार’ परवडत नाही.
४. *’विकासा’ची व्याख्या बदला: बदलणे गरजोचे आहे. असा विकासच’ नाही .हा ‘गर्भहत्या’ करण्याचा परवाना आहे.
*माईमीडिया२४ चे ५ठोस उपाय – ‘गर्भ ते गणवेश’ सुरक्षा हमी*
*सरकारला जमत नसेल, तर माई सांगते काय करायचं ते:*
१. *’उज्ज्वला २.०’ तातडीने लागू करा:*
– *१२ सिलिंडर परत द्या:* अनुदान ४ वरून १२ सिलेंडर वर करा.
– *दर ५०० वर आणा:* गरीब मायला परवडेल असा दर फिक्स करा. जाहिरातीवर खर्च खूप। करता इथे सबसिडी द्या.
– *’ गॅस सवलत सरेंडर’ केलेल्यांचा हिशोब द्या:* आम्ही सोडलेला गॅस कुठे गेला, त्याचा व्हाईट पेपर काढा.
२. *’एक झाड तोडलं, तर १० झाडं लावा’ असा सक्तीचा कायदा करा:*
– शक्तीपीठ, इमले, रस्त्यांसाठी तोडलेल्या *प्रत्येक १ झाडामागे १० देशी झाडं* लावून ३ वर्ष जगवण्याची तोडणाऱ्यांना सक्ती करा.
*’वृक्ष पोलीस’ नेमा: तोडलेली झाडं मोजणारी, नव्याने लागवड तपासणारी स्वतंत्र यंत्रणा.
*बिल्डरवर ‘ग्रीन टॅक्स’:* प्रत्येक इमल्यामागे १०० झाडं बांधकामाच्या परिसरात तिथेच लावलीच पाहिजेत.
३. *’गर्भ ते गणवेश’ सुरक्षा योजना – १०९८ हेल्पलाईन:*
– *एका फोनवर सेवा:* गर्भवती महिलेसाठी २४x७ हेल्पलाईन असावी.. कॉल केला की ‘अँब्युलन्स + तज्ज्ञ डॉक्टर + मोफत सोनोग्राफी + रक्त-लघवी तपासणी’ ३० मिनिटात घरपोच सोवा हवी
– *’माता आहार किट’ घरपोच:* प्रत्येक महिन्याला लोह, कॅल्शियम, प्रोटीन पावडर, डाळी, गूळ-शेंगदाणे मोफत.
– *’आशा’ ताईला अधिकार द्या:* गर्भवतीची नोंदणी, तपासणी, किट वाटप यासाठी ‘आशा’ वर्करला थेट ५००० ₹ मानधन द्या.
४. *प्रदूषण नियंत्रण ‘मिशन मोड’वर आणा:*
– *AQI २०० पार = रेड अलर्ट:* शाळा बंद होतात तसे *प्रदूषण करणारे कारखानेही तातडीने बंद करा. ‘ऑड-इव्हन’ फक्त सामान्यांच्या गाड्यांना का? इथेही कडक कारवाई व्हायला हवी
– *चुलीमुक्त गाव योजना:* १००% गॅस कनेक्शन असलेल्या गावाला ‘धूरमुक्त गाव’ पुरस्कार + १०लाख विकासनिधी द्या.
– *’सिटी फॉरेस्ट’ सक्तीचे:* प्रत्येक शहरात २५% जमीन झाडांसाठी राखीव ठेवा.
५. *’जबाबदारी नक्की’ करा – बेजबाबदार अधिकाऱ्याचा पगार कापा:*
– ज्या जिल्ह्यात माता मृत्यू दर वाढेल, AQI ३०० च्या वर जाईल, *त्या जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्याचा ५०% पगार कापा.*
– ‘समिती’ नेमून अहवाल देण्यापेक्षा ‘कृती’ न करणाऱ्या अधिकाऱ्यावर थेट कारवाई करा.
*शेवटचा इशारा:*
“प्रदूषणामुळे पोटातला जीव गुदमरतोय… आणि आपण ‘GDP’च्या गप्पा मारतोय?”
*’समिती’ नको, ‘ऑक्सिजन’ द्या. ‘जुमले’ नको, ‘उपाय’ करा.*
*’आरोग्य क्रांती’ म्हणजे ‘जन्माआधीपासून’ श्वासाची हमी.*
*’माडी’ बांधायची असेल तर आधी ‘माणूस’ जगला पाहिजे. आणि ‘माणूस’ जगायचा असेल तर ‘पोटातला जीव’ वाचला पाहिजे.*
*यालाच म्हणतात – ‘जुमले जमतात, सरकार चालवता येत नाही!’ जमत नसेल तर खुर्ची सोडा.*
—-















