Home मुंबई *तुम्ही मेडिकल चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी*

*तुम्ही मेडिकल चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी*

15
0

*फार्मसिस्ट हजर नसलेली मेडिकल दुकाने आता सील होणार; आयुक्त मुंडेंचे कडक आदेश*

मुंबई – राज्यातील आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता आणि रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. ज्या मेडिकल दुकानांमध्ये (औषधालयांमध्ये) नोंदणीकृत फार्मसिस्ट उपस्थित नसतील,अशी दुकाने त्वरित सील करण्यात यावीत, असे कडक निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

नियमांनुसार, कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये औषधांची विक्री करताना पात्र फार्मसिस्टची उपस्थिती अनिवार्य आहे.मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेत आयुक्त मुंडेंनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

औषध विक्रीच्या वेळी फार्मसिस्टचे दुकानात असणे कायद्याने बंधनकारक आहे.नियमांचे पालन न करणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते.चुकीच्या किंवा अयोग्य सल्ल्याने होणारी औषध विक्री रोखणे आणि रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे.

प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे आता मेडिकल व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य झाले आहे. या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, यामुळे औषध विक्रीत शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here