बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत आयसीएसई मंडळाशी संलग्न एकमेव मुंबई पब्लिक स्कूल वूलन मिल्स या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले आहे.
या परीक्षेत वीर खाटीकमारे याने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुशल जैन (९५.६० टक्के), अंशिका राणा (९३.८० टक्के), रोनक परब (९१.८० टक्के), राज खाटीकमारे (९१.६० टक्के) आणि ओम गुप्ता (९०.८० टक्के) या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच ऋषिकेश साळवे (८९.८० टक्के), दर्श कुर्लीकर (८८.२० टक्के), सारांश एम (८७.२० टक्के) आणि कुवम (८६.४० टक्के) यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. आयुष साकपाळे (८४.८० टक्के), हृषभ कंवजिया (८३ टक्के), देवांश (८०.८० टक्के), अरबिश (८०.८० टक्के) आणि मोमिना शेख (८०.६० टक्के) यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. तसेच मानेओ माओ (७९ टक्के), मेहर कौर (७८.६० टक्के), दक्ष जैन (७८.४० टक्के), सार्थक मोरे (७७ टक्के) आणि गणेश चौधरी (७५.२० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.
***


















