*’जय महाराष्ट्र’ म्हणायचे असेल, तर आधी ‘जय पोषण’ म्हणावच लागेल!*
*अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील (धारणी-चिखलदरा) कुपोषण ही गंभीर आरोग्य समस्या असून, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान ९२ बालकांचा मृत्यू या समस्येशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अज्ञान, गरिबी, स्थलांतर, सकस अन्नाचा अभाव आणि आरोग्य सुविधांची वानवा यामुळे बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे प्रमाण येथे वर्षानुवर्षे कायम आहे.*
*कुंभमेळा २०२६’ मध्ये लाखो भाविक येणार, पण याच महाराष्ट्रात हजारो बालके कुपोषणाने ग्रासली आहेत. ‘हरित कुंभ’सोबत ‘पोषण कुंभ’चीही जास्त गरज आहे.*
*कुपोषण म्हणजे काय? हे सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराच्या वाढीसाठी लागणारी प्रथिने,* *जीवनसत्त्वे, खनिजे, उष्मांक पुरेसे न मिळणे किंवा त्यांचे असंतुलन असणे म्हणजे कुपोषण!*
*याचा परिणाम काय होतोय तर मुलांची वाढ खुंटणे, वजन न वाढणे, थकवा यासारखे आजारी पडणे आजही विकसित महाराष्ट्र घडत आहेत , ही मोठी हार आहे. कारण अजुनही*आपण आरोग्य, माता- बालके , सकस आहार या सगळ्यात कमी पडतोय.आणि हे घडतय कुठे तर नागपुर जवळपास असलेल्या अमरावतीत.*
*रोड, ब्रिज सम्राट केंद्रिय मंत्री नीतीन गडकरी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे किती बलदंड नावं आहेत या विदर्भातील!*
*आणि या ठिकाणचा अतिशय गंभीर विषय या गरीबांच्या स्त्रीशक्ती च्या व छोट्या बाळांच्या सुदृढ जगण्याचा आहे.*
*तो आपण या परिसरातून कायमचा गाडू का शकलो नाही? यावर चिंतन मनन व अचूक कृती कधी करणार? खरं स्त्री सक्षमीकरण इथे व्हायला* *हवे. पण लक्षात कोणी घेत नाही…कारण बापडी लोकं अशीच तडफडत जगताहेत.*
*ही या नेत्यांची हार तशीच आपल्या महाराष्ट्राची हारआहे. यावर तातडीने कोणी कृती करणार की नाही?*
● *ओ शेट , राजकीय सत्ताकारणी , संवेदनशीलपणे या विषयावर काम कधी होणार? योजना असतील तर अंमलबजावणीत कुठे कमी पडतोय आपण?*
*कुपोषण कशाने होतं तर अन्नाची कमतरता* *उष्मांक-प्रथिनांची कमतरता वजन खूप कमी, हाडकुळे शरीर*
*तर मॅरास्मस म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता; यात लोह, अ जीवनसत्त्व, जस्त कमी असते. रक्तक्षय, रातांधळेपणा, *रोगप्रतिकारशक्ती कमी होते.*
*दुसरीकडे अतिपोषण म्हणजे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज मिळणे, लहान वयात लठ्ठपणा,मधुमेहाचा धोका निर्माण होतो.*
*तर मॅरास्मिक-क्वाशियोरकोर हे दोन्ही एकत्र होतात तेव्हा पोट फुगलेले, पण हात-पाय काड्या, केस लालसर-पातळ झालेले असतात.*
● *महाराष्ट्रातले चित्र काय आहे तर ;*
*धोक्याची घंटा दिली गेलीहोती NFHS म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० नुसार उंचीच्या मानाने कमी वजन (Wasted) २५.६% मुले. म्हणजे ४ पैकी १ मूल कुपोषित.*
*वयानुसार कमी उंची (Stunted) असलेली.२% मुले. म्हणजे ३ पैकी १ मुलाची वाढ खुंटलेली आहे.कमी वजनाची ३६% मुले.*
*रक्तक्षय , ६महिने ते ५ वर्षे वयोगटातील ६८.९% मुलांना. गरोदर मातांमध्ये ५४%.दिसला.*
*सर्वात जास्त बाधित मेळघाट, नंदुरबार, गडचिरोली, पालघरचा आदिवासी भाग. तर मुंबईच्या झोपडपट्ट्यांतही हे प्रमाण ३०% पेक्षा जास्त असलेले दिसले.*
*याची कारणे ही फक्त गरिबी नाही, तर ५ ‘ग’ कारणीभूत आहेत.*
*गरीबांना रोज २ वेळा पोटभर अन्न मिळत नाही. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात सकस आहार परवडत नाही.*
*आईच कुपोषित असेल तर बाळ जन्मत २.५ किलो पेक्षा कमी वजनाचे असते. ४०% बालके ‘लो बर्थ वेट’ असलेली दिसली.*
*मुलांना जन्मल्याबरोबर ६ महिन्यांआधी वरचे दूध/पाणी पाजणे, पहिल्या १तासात स्तनपान न देणे. असे गैरसमजातून घडते..*
*फक्त मेघालय-त्रिपुरात ५०% पेक्षा जास्त बालकांना योग्य पूरक आहार मिळतो. आपण कुठे आहोत यावर महिला व बालकल्याण विभाग काय अंमलबजावणी करतो हे कळलं पाहिजे.*
*हात स्वच्छ न धुणे, अस्वच्छ पाणी वापरणे, आणि जुलाब-हगवण झाली की खाल्लेले अंगी लागत नाही. एका जुलाबाने १०दिवसांचे पोषण वाया जाते.*
* *’जाड मुल म्हणजे गुटगुटीत’ असा एक गैरसमज त्यामुळे अतिपोषणाकडे दुर्लक्ष होते. ‘मुलगी आहे, कमी खाल्ले तरी चालेल’ असाही भेदभाव होतो.याला काय म्हणायचे. हा भेदाभेद कशासाठी?*
● *’पाच’चा पंचसूत्री कार्यक्रम आहे.*
*गरोदरपण + २वर्षे. या काळात माता-बालकाच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक! अंगणवाडीतून THR- टेक होम रेशन, आयर्न-फॉलिक ॲसिड गोळ्या देणे हे काम अचूकतेने होते का?*
*पांढरा भात/भाकरी, हिरवी पालेभाजी, पिवळी डाळ/अंडी. महिन्याला २५अंडी, १ किलो डाळ अंगणवाडीतून मिळते . पण ती गरजूंपर्यत पोहोचते का?*
*स्वच्छ पाणी मिळणे , स्वच्छतागृह यात पुरेशी स्वच्छता राखली जाते का?*शौचानंतर साबणाने हात धुणे आवश्यक आहे.उकळलेले/फिल्टर पाणी. हे तर कठीणच आहे.*
*गोवर, न्यूमोनिया, जुलाबाच्या लसी घेतल्या जातात का? कारण बाळ आजारी पडले तर कुपोषण वाढते असं दिसून येते.*
*दर महिन्याला अंगणवाडीत वजन-उंची मोजणे लाल झोनमध्ये असेल तर NRC म्हणजे न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये १४ दिवस बाळाला दाखल करणे. त्यावर मोफत उपचाराची सोय आहे.*
*तर अतिगंभीर कुपोषणावर डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध, जीवनसत्व अ, जस्त, लोह द्यावे लागते. असं सगळं आहे. पण ते फक्त कागदावर आहे का असं म्हणण्यास पुर्ण वाव आहे.*
*इथे आडात आहे …पण पोहऱ्यात पोहोचत नाही की ‘आड’च सगळं स्वाहा करतोय? याचा शोध आणि बोध जर घेतला नाही तर या कुपोषित बालकांचे, कमजोर मातांचे गुन्हेगार असून आपण!*
● *कुंभमेळा २०२६ आणि पोषणसंधी*
*कुंभमेळ्यात ५ कोटी भाविक येणार आहेत. त्यात हजारो कुपोषित मुलेही असतील. प्रशासनाने ‘महाप्रसाद’ सोबत ‘पोषण प्रसाद’ही द्यावाच!*
*प्रत्येक सेक्टरमध्ये ‘पोषण केंद्र’ उभारुन मुलांची तपासणी, ORS, शिरा,*उपमा, अंडी वाटपही करावे.*
*गर्दीत मातांना लाज न वाटता स्तनपान करता यावे यासाठी सुरक्षित जागा असावी.*
*कीर्तन-प्रवचनातून ‘पोटोबा सांभाळा, मग विठोबा’ संदेश दिला जावा. आखाड्यांनी भंडाऱ्यात डाळ-भात-लाडू सोबत शेवग्याची भाजीही असावी.*
*कुंभासाठी येणाऱ्या १२,००० कोटींतून सी आर एस निधी म्हणून १% ‘बाल पोषण’वर खर्च करण्यात यावा त्यासाठी NRC केंद्र अद्ययावत करणे अती आवश्यक आहे.*
*खरं तर कुपोषण हे एका दिवसात जात नाही. पण एका दिवसात चांगली सुरुवात तर होऊ शकते. यात सरकारबरोबरच समाजाच्या सहकार्याचीही गरज आहे.*
*आपल्या घरातील, गल्लीतील ५ वर्षांखालील मुलाचे वजन करावे . लाल, पिवळा, हिरवा झोन ओळखायला हवा झोन लाल असेल तर उद्याची वाट बघू नयेत आजच अंगणवाडी सेविका किंवा डॉक्टर गाठायचाय.*
*ग्रामस्वच्छता जनजागृती अभियानासारखी ‘कुपोषण हटवा, बालक वाचवा’ मोहिम जोरदार राबविण्यात यावी.*
*जरा विचार करा,कुंभात गोदावरीत डुबकी मारून पाप धुतले जाते. पण कुपोषणाची डुबकी मुलांचे भविष्य धुवून टाकते. देव धर्म सगळं ठीक पण*
*’सुरक्षित कुंभ’सोबत ‘सुपोषित कुंभ’ करूयात!*
*आणि मला वाटतं हीच खरी गोदामाईची सेवा ठरेल.*
● *हे यश नाही, ही शोकांतिका आहे!*
*सिंहस्थ कुंभमेळा २०२६ साठी आपण १२,००० कोटींचे रस्ते बांधतोय, ५कोटी भाविकांसाठी स्वागत कमानी उभारतोय. पण याच महाराष्ट्रात ३ पैकी १मूल ‘खुंटलेले’ आहे आणि ४पैकी १मूल ‘हाडकुळे’ आहे.*
● *ही प्रगती नाही. इथे महाराष्ट्राची हार आहे.*
*हार का आहे , कुपोषण म्हणजे काय गमावतो आपण?*
*बाळाच्या जन्माच्या१ल्या १००० दिवसांत मेंदूची ८०% वाढ होते. कुपोषित मुलाचा आय क्यू १०-१५ पॉइंट्स कमी असतो. म्हणजे उद्याचा इंजिनिअर, डॉक्टर, शास्त्रज्ञ आजच हरवतोय आपण!*
*जागतिक बँक सांगते की कुपोषणामुळे देशाच्या जीडिपी ला ४% फटका बसतो. महाराष्ट्राचा जिडीपी ४५ लाख कोटी आहे. म्हणजे दरवर्षी १.८लाख कोटींचे नुकसान. १२,००० कोटींचा कुंभ १५० वेळा भरेल एवढे आहे हे.*
*तर ५४% माता रक्तक्षयी असतील म्हणजे फिकट चेहऱ्याची आई गुलाबी गालाचे बाळ कसे जन्माला घालणार? कुपोषित आई = कुपोषित बाळ = कुपोषित पिढी असे हे दुष्टचक्र आहे.*
*शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा. ज्यांनी ‘रयतेचे राज्य’ आणले. आज त्याच रयतेची पोरंबाळं उपाशी? गडकोट बांधणाऱ्या राजाचा मावळा आज अंगणवाडीतल्या* *शिऱ्यासाठी रांगेत उभा राहातोय. ही हार नाही तर काय आहे?*
● *ही हार कोणामुळे होतेय? कोण आहेत याचे गुन्हेगार?*
*’आम्ही योजना काढल्या’ म्हणून पाठ थोपवण्यात धन्यता मानतो. पण मेळघाटात आजही ४०% मुले तीव्र तीव्र कुपोषित आहेत. योजना कागदावर, पोरं मृत्यूच्या दारात. हे काय आहे .*
● *आणि ही हार कशी जिंकायची असेल तर ‘कुंभ ते कुपोषणमुक्ती’ साठी काही संकल्प करायला हवेत.*
*सिंहस्थ २०२६ ही संधी आहे. ५ कोटी लोक, हजारो कोटींचा निधी, संपूर्ण यंत्रणा कामाला लागणार. सोबतच हेच बळ कुपोषणावर ही कामी लावा.*
*हा संकल्प कुंभात कसा राबवणार याचा विचार केला तर खूप काही करता येईल.*
*प्रत्येक गरोदर माता नोंदणीकृत करणे, महिन्याला २५अंडी + १ किलो डाळ कुंभाच्या ‘महाप्रसाद’ किचनमधून गरोदर मातांना ‘पोषण किट’ देता येतील.*
*अंगणवाडी = पोषण मंदिर बनावे .डिजिटल वजनकाटा, RO पाणी, शिक्षित सेविका, कुंभ सेक्टरमध्ये ‘मॉडेल अंगणवाडी’ उभारता येईल. ५ कोटी भाविक बघतील, कंपन्यांकडून CSR फंड येईल*
*स्तनपान कॉरिडॉर उभारून पहिल्या १ तासात स्तनपान, ६ महिने फक्त अंगावरचे दूध रामकुंड ते तपोवन दर १ किमीवर ‘हिरकणी कक्ष’ – वातानुकूलित, स्वच्छ, सुरक्षित असा उभारता येईल.*
*हात धुणेसाठी व इतर कामासाठी स्वच्छ पाणी असावे प्रत्येक पाणपोईजवळ साबण, ORS मिळावे. याचा कीर्तनातून संदेश दिला जावा.*
*’माझे मूल, माझी जबाबदारी’ ही लोकचळवळ व्हावी.आखाडे, वारकरी, साधू यांनी भंडाऱ्यात ‘शेवगा लाडू’ वाटावा. विचार करा सरकार धर्मासह + पोषण होईल.*
● *या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न आहे की हा कुंभ मेळा कशासाठी?*
*गोदावरीत स्नान केले की पाप धुतले जाते, असे म्हणतात. पण ज्या राज्यात ३६% मुले कमी वजनाची आहेत, तिथे कुंभाचे पुण्य लागेल का?*
*छत्रपती शिवरायांनी ‘रयतेचे अश्रू पुसले’. समर्थांनी ‘मनाचे श्लोक’ शिकवले. आज रयतेची लेकरं अश्रू ढाळताहेत भुकेने… कृती करा सरकार त्यांचे अश्रू पुसले तरच शिव-समर्थांचा, ज्ञानदेव- तुकोबांचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ‘धन्य’ होईल!*
*कुपोषित मूल म्हणजे फक्त एका घराची हार नाही. ती महाराष्ट्राची हार आहे. प्रगत महाराष्ट्राची, पुरोगामी महाराष्ट्राची, ‘एक नंबर’ महाराष्ट्राची हार आहे.*
*२०२६ चा कुंभ ‘हरित’ असेल, ‘डिजिटल’ असेल,’सुरक्षित’ असेल.* *पण तो ‘सुपोषित’ नसेल, तर तो ‘पराभूत’ असेल.*
*कारण माय गोदावरी विचारेल – “५ कोटींना पाणी दिलेस, पण माझ्या लेकरांना दूध दिलेस का?”*
*बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटी, पण अंगणवाडी सेविकेला१०,००० पगार द्यायला पैसे नाहीत. स्टॅच्यूसाठी निधी, पण घरी नेण्याच्या पोषण आहारात अळ्या निघतात.*
*सगळ्या लढाया चालू द्यात. पण मूळ विषयावर का लक्ष नाही? हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय.*
*बुलेट ट्रेन धावेल, समृद्धी महामार्ग लोळेल, स्मार्ट सिटी चमकेल. नंदुरबारच्या ज्या आदिवासी पाड्यातून हा महामार्ग जातो, तिथे आजही ४५% मुले कुपोषित आहेत. मेळघाटात जिथून बुलेट ट्रेनची सुसाट लाईन जाणार, तिथे गेल्या वर्षी १५० बालके कुपोषणाने गेली. मुंबईच्या ज्या झोपडपट्टीवरून मेट्रो धावते, तिथल्या १० पैकी ७ माता रक्तक्षयी आहेत.*
*मग सांगा, हा विकास कोणासाठी? ही प्रगती कोणाची?*
*जय महाराष्ट्र म्हणायचे असेल, तर आधी ‘जय पोषण’ म्हणावे लागेल.* *नाहीतर ‘कुपोषित मुले म्हणजे महाराष्ट्राची हार’ ही ओळ इतिहासात कायमची कोरली जाईल!*
***





















