*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कामगार नेते शशांक राव व संजय निरुपम यांची आज बैठक*
‘ व्यवहारिक मराठी ‘ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते *शशांक राव व संजय निरुपम* यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.
ही बैठक सोमवार दि.२७ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांच्या दालनात (४०१ विस्तारित इमारत, मंत्रालय) दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, या मुद्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे यावर चर्चा होणार आहे.

















