Home मुंबई *पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा , बाळासाहेबांनी हाही विचार दिला* : खा...

*पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा , बाळासाहेबांनी हाही विचार दिला* : खा अरविंद सावंत

15
0

जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या ४४ व्या वर्षाचा शुभारंभ
मुंबई
“जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता ? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे,” अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी बोलून दाखविली. बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक विचार महत्त्वाचे आहेत. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तेंव्हा भारतीय जनता पक्षाच्या सुंदर सिंह भंडारी यांनी हात वर केले आणि बाबरी मशीद शिवसैनिकोने गिरायी असे सांगितले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो, अशी डरकाळी फोडणारे बाळासाहेब ठाकरे हेच होते. “अरविंद सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला. जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या ४४ व्या वर्षाचा शुभारंभ ‘आठवणीतले बाळासाहेब’ या व्याख्यानाने दणदणीत शुभारंभ झाला. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते, त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक वेळा संघर्ष केला. शिवसेनेचा सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा होता. नव्या पिढीला फक्त सुवर्णकाळ माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः काहीही न घेता सामान्य शिवसैनिकाला मोठे केले. सामान्यांना भरभरून दिले. त्यांच्या जीवनात असंख्य पैलू होते. सामान्य शिवसैनिक जेवला कां ? त्याला काही त्रास होतो काय? सामान्य कार्यकर्त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असायचे. जगाच्या पाठीवर हा एकमेव नेता होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व कनवाळू, दिलदार, अलौकिक होते. प्रसंगी ते कणखर वाटत पण ते माया पण तेवढीच करीत असत. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कुमार कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या असंख्य आठवणी सांगताना शिवसेना स्थापन होण्यापूर्वी आणि नंतरच्या घडामोडी सांगितल्या. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच होऊ शकले, याची आठवण सांगताना रा. सु. गवई हे शरद पवार मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर कसे आले आणि काय काय घडामोडी घडल्या त्याची हकीकत सांगितली या सर्वात आपल्याला योग्य भूमिका मांडता आली याबद्दल आपण भाग्यवान ठरलो, हे आवर्जून सांगितले. डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात बाळासाहेब ठाकरे हे सामान्यातल्या सामान्य व्यक्ती तसेच पत्रकारांच्या पाठीशी कसे उभे रहात याचे किस्से सांगितले. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे प्रणेते, जय महाराष्ट्र नगर चे भाग्यविधाते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या कार्याचा तीनही मान्यवरांनी गौरव केला. अरविंद सावंत, कुमार कदम आणि डॉ. सुकृत खांडेकर यांचा शाल, सन्मानचिन्ह, बॅनरांजली, योगेंद्र ठाकूर लिखित ठाकरे, विद्वत्तेचा महामेरू ही पुस्तके देऊन सत्कार केला. आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार विलास पोतनीस यांनाही सन्मानित करण्यात आले. वैशाली विजय वैद्य, सचिन वगळ, श्याम पंडित, वैभव वैद्य, राजा खोपकर, अभिलाष कोंडविलकर, वनिता दळवी, रोहिणी चौगुले, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, हेमंत पाटकर, उद्योजक विजय घरटकर शिवभक्त राजू देसाई, विजय तारी, विजय घरटकर, दादासाहेब शिंदे, मनोहर देसाई आदी पदाधिकारी आणि असंख्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या मुलींनी गायिलेल्या सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. नयना रेगे यांनी समयोचित सूत्रसंचालन केले. रेखा बोऱ्हाडे आणि कांचन सार्दळ यांच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here