*बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे थोर साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने शुक्रवार, दि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महानगरपालिका सभागृह, पहिला मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.*
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक माननीय वसंत आबाजी डहाके यांचे व्याख्यान यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माननीय महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, विरोधी पक्ष नेते किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी (सक्रे), शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
















