Home मुंबई स्वीकृत सदस्य नव्हे , राज ठाकरेंच्या मनसेला २ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद ?

स्वीकृत सदस्य नव्हे , राज ठाकरेंच्या मनसेला २ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद ?

51
0

यशवंत किल्लेदार – सुरज चव्हाणांमध्ये चर्चा

शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदांवरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मुंबई महापालिकेतील संख्याबळानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ७ प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे येत आहेत. मात्र आपल्या मित्रपक्ष असलेल्या मनसेला त्यापैकी एक किंवा दोन प्रभाग समिती अध्यक्षपदे देण्याबाबतची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते.
स्वीकृत नगरसेवकांऐवजी अध्यक्षपदाचा पर्याय
मनसेकडून सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाकरेंनी आपल्या कोट्यातील तीनही स्वीकृत नगरसेवक आपल्या पक्षातूनच देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

या सगळ्यात मनसेला समाधान देण्यासाठी प्रभाग समिती अध्यक्षपदाचा पर्याय पुढे आल्याचे समजते.

यशवंत किल्लेदार – सुरज चव्हाण यांच्यात बैठक
या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरें शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांच्यात बैठक झाली असून, प्रभाग समिती अध्यक्षपद वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. अजून एक ते दोन बैठका होण्याची शक्यता असून त्यानंतर अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

.
स्वीकृत नगरसेवकांची नावंही निश्चित
दरम्यान, शिवसेना (उबाठा) कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावे निश्चित झाल्याचे समजते आहे. त्यामुळे मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता संपुन आता प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते.

याविषयी आणखी काही बैठका होण्याची शक्यता असून त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होऊ शकतो. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात ठाकरे बंधुत आलबेल आहे असे म्हटले जात आहे.

👆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here