गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शनिवार दि १४ फेब्रुवारी २०२६ ला सांयकाळी आकस्मिक पाहणी केली.
महापौर रितू तावडे यांनी अपघात विभाग, महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, पुरुष वैद्यकीय रुग्ण कक्ष, अतिदक्षता कक्षाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर महिला कक्षात पिण्याच्या पाण्याची, बालकांसाठी स्वतंत्र पाळणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
दैनंदिनपणे कक्षाची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्याची रुग्णालयांची कार्यपद्धती समजावून घेतली.
यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. पवार उपस्थित होते.
…….

















