Home नागपूर *चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार –कुणाल चौधरी, विदर्भ प्रभारी काँग्रेस*

*चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार –कुणाल चौधरी, विदर्भ प्रभारी काँग्रेस*

64
0

*चंद्रपूर महापालिकेत गटनेता आणि उपमहापौर पदी काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांना मिळाली संधी*

नागपूर, दि.५ – चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा अखेरीस सुटला आहे. काँग्रेसचे गटनेता म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महापालिकेत उपमहापौर पदी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज भरला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता काँग्रेसची गटनोंदणी होणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

गेले काही दिवस चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस बाबत संभ्रमाचे वातावरण होते.दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर अखेरीस आज तोडगा निघाला. उपमहापौर पदी अनुभवी आणि काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार वसंत देशमुख यांनी अर्ज भरला तर गटनेते पदी वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश अडूर यांच्या नियुक्तीचे पत्र देखील पक्षाकडून अधिकृतरित्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौर पदी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौर पदी देखील खासदार धानोरकर यांच्या समर्थकांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबाबत चर्चा होऊन अर्ज मागे घेण्यात येईल अस वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

महाराष्ट्र काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी म्हणाले की “चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार,चंद्रपूरच्या विकासासाठी काँग्रेस काम करणार .”असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून जनविकास सेना पप्पू देशमुख यांचे तीन नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत.त्यांना MIM पक्षाने पाठिंबा दिल्याने ते एक नगरसेवक जानविकास सेनेबरोबर आहे.बसपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या ३२चे संख्याबळ असून अजून २ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थायी समिती देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असून त्या पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून अंतिम निर्णय लवकरच होईल .” असे ही वडेट्टीवार म्हणाले.

“राज्यात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वर एक टँकर कलांडल्यामुळें या मार्गावर तब्बल ३२ तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यातूनच राज्य सरकारचा विकास दिसत आहे. या घटनेतून सरकारची नाचक्की झाली आहे, चंद्रावर, मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतात आणि द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीसाठी यंत्रणा नाही यातून सरकार किती कार्यक्षम आहे हे जनतेला दिसले .” असा टोला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here