Home मुंबई *विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार*

*विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार*

60
0

*किमान वेतन हक्क संघर्ष समितीचे कामगार आयुक्तांना निवेदन* .
सोलापूर
सोलापुरातील महिला विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही म्हणून सहा. कामगार आयुक्त या नात्याने महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश उत्पादक कारखान्यांना द्या अन्यथा विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समिती सोलापूरच्यावतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वजा निवेदन किमान वेतन हक्क कृती समितीच्या वतीने सहा. कामगार आयुक्त यांना देण्यात आले असल्याचे समितीचे सदस्य विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
विडी कामगार हक्क कृती समितीच्या वतीने सहा. कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सोलापूरातील महिला विडी कामगारांना किमान वेतन गेल्या अनेक वर्षापासून मिळत नाही. याबाबत महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेल, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी मजदुर संघ (इंटक) अशा आम्ही चारही संघटना एकत्रित येऊन गेल्या ४ ते ५ वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यासाठी कामगारमंत्री, कामगार आयुक्त,अप्पर कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रत्यक्ष भेटून व विविध आंदोलनाद्वारे निवेदने देण्यात आले. परंतु याबाबत अद्यापी कोणतेही निर्णय किंवा किमान वेतनाची अंमलबजावणीची कार्यवाही झालेली नाही. याबाबत मा. कामगार मंत्री महोदयांनी विडी उद्योजक, कामगार संघटना आणि सरकारी अधिकारी अशी संयुक्त बैठक देखील बोलविले. काही वेळा बैठका रद्द झाल्या तर यापैकी दि. १६/०९/२०२५ रोजी कामगार मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस विडी उद्योजक उपस्थित राहिले नाहीत. सदर बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे सोलापूरातील महिला विडी कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. आणि विडी उद्योजक मनमानी करुन विडी कामगारांना कमी मजुरी देऊन काम करुन घेत आहेत हे महिला विडी कामगारांवर अन्याय करण्याचे कृत्य आहे व कामगार विरोधी धोरणाचे आहे. तरी माननीयांनी सोलापूरचे सहा. कामगार आयुक्त या नात्याने विडी कामगारांना किमान मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे. विष्णु कारामपुरी (महाराज) सायबण्णा तेग्गेळी , गोवर्धन संचू , राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणा-या शिष्टमंडळात रेखा आडकी , शोभा पोला , लक्ष्मीबाई कोतलापुरे , विठ्ठल कुराडकर , पप्पू शेख , गुरुनाथ कोळी , श्रीनिवास बोगा यांच्यासह महिला विडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते

***
*फोटो मॅटर* – सोलापुरातील विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समिती च्यावतीने माननीय सहा. कामगार आयुक्त यांना निवेदन देताना विष्णू कारमपुरी (महाराज) सायबण्णा तेग्गेळी , राहुल गुजर , डॉ. गोवर्धन संचू , रेखा आडकी यांच्यासह समितीचे पदाधिकारी दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here