Home मुंबई पार्ले-जी कारखान्याचा ९७ वर्षांचा वारसा संपुष्टात, विलेपार्ल्यात या जागेवर उभे राहणार भव्य...

पार्ले-जी कारखान्याचा ९७ वर्षांचा वारसा संपुष्टात, विलेपार्ल्यात या जागेवर उभे राहणार भव्य व्यावसायिक संकुल

107
0

मुंबई
मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेला आणि विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातून जाताना दरवळणाऱ्या बिस्किटांच्या सुवासासाठी ओळखला जाणारा ऐतिहासिक ‘पार्ले-जी’ कारखाना आता इतिहासजमा होणार आहे. पार्ले प्रॉडक्ट्सला (Parle Products) त्यांच्या विलेपार्ले (पूर्व) येथील जुन्या कारखान्याचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाकडून (SEIAA) अंशतः पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे.

ऐतिहासिक वारशाचा शेवट चौहान कुटुंबाने १९२९ मध्ये स्थापन केलेला हा कारखाना पार्ले-जी बिस्किटांचे जन्मस्थान मानला जातो. या कारखान्यामुळेच या परिसराला ‘विलेपार्ले’ अशी ओळख मिळाली होती. तब्बल ८७ वर्षे बिस्किटांचे उत्पादन केल्यानंतर २०१६ मध्ये येथील उत्पादन थांबवण्यात आले होते. तरीही, ही वास्तू मुंबईच्या औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून उभी होती. आता मिळालेल्या मंजुरीनुसार, या जागेवरील २१ जुन्या इमारती पाडण्यात येणार आहेत.

जागेवर काय उभे राहणार? सुमारे ९ हेक्टर (सुमारे २२.२३ एकर) क्षेत्रफळाच्या या जागेवर तब्बल ५,०६१ कोटी रुपये खर्च करून एक अत्याधुनिक व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे.

प्रकल्पाचे स्वरूप: या नवीन प्रकल्पात ५ मुख्य व्यावसायिक इमारती आणि ६ व ८ मजल्यांचे दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्स असणार आहेत.

सुविधा: या संकुलात रिटेल दुकाने, कार्यालये, रेस्टॉरंट्स आणि फूड कोर्ट्स असतील. तसेच प्रत्येक इमारतीला दोन बेसमेंट लेव्हल्स असतील.

पर्यावरणीय भान: या पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार असून, मियावाकी पद्धतीने झाडे लावली जातील, ज्यामुळे येथील झाडांची संख्या ३,२३० पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कमिशनर यांनी किमान १,५०० मोठी झाडे लावणे येथे सक्तीचे केले आहे..सगळी प्रॉपर्टी ची विक्री किंमत रस ११,००० कोटी + आसू शकते..सरकार ल रस १०००-१५०० कोटी टॅक्स मिळू शकतो…इथे ६-७,००० जॉब्स निर्माण होऊ शकतात…नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे कारण हा ९ हेक्टर च मोठा फॅक्टरी परिसर होता.

विमानतळ परिसराचे निर्बंध हा प्रकल्प मुंबई विमानतळाच्या जवळ आणि ‘एअर फनेल झोन’मध्ये येत असल्याने, इमारतींच्या उंचीवर मर्यादा असतील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) नियमांनुसार या इमारतींची उंची ३० मीटरच्या आसपास मर्यादित ठेवावी लागणार आहे.

या निर्णयामुळे मुंबईच्या नकाशावरील एक ऐतिहासिक खूण पुसली जाणार असली, तरी त्या जागी उभे राहणारे हे नवीन संकुल विलेपार्लेच्या विकासात मोठी भर घालेल, असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here