Home मुंबई डोबिवली एमआयडीसी मधील मृत कामगारांच्या वारसांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत करावी...

डोबिवली एमआयडीसी मधील मृत कामगारांच्या वारसांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत करावी – डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची सूचना

300
0

डोबिवली एमआयडीसी मधील मृत कामगारांच्या वारसांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत करावी – डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची सूचना

एमआयडीसी स्फोटाच्या घडणाऱ्या घटनाना आळा बसण्यासाठी शासनाने यासंदर्भात नियमावली तयार करुन तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत मंत्री, उद्योग यांना पत्र

मुंबई :- राज्यात दिनांक 12 जून, 2024 रोजीपर्यंत डोबिवली एमआयडीसी येथे फेज दोन मधील कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडल्याचे आशयाचे वृत्त काही वृत्तमानपत्रातून प्रसिध्द झाले आहे.
याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद, निलमताई गोऱ्हे यांनी अशा प्रकारच्या घटना पून्हा- पुन्हा घडू नये यासंदर्भात त्यांनी शासनास अनेक सूचना केल्या आहेत व त्यांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केली आहे. सुचनेत त्यांनी शासन स्तरावरून एमआयडीमध्ये अशा स्फोटाच्या घटना घडू नयेत यासाठी नियमावली करणेत यावी व त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. सदरच्या घटनांमध्ये मृतांच्या वारसांना व जखमींना सत्वर शासकीय मदत करण्यात यावी. डोंबिवली येथील सर्व कंपन्यांचा सर्व्हे करून धोकादायक व नियमाचा भंग करणाऱ्या कंपन्यांवर उचित कार्यवाही करण्यात यावी.आपत्ती व्यवस्थापन कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. प्रत्येक हॉस्पिटल मध्ये बर्न वॉर्ड तयार करावा.आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्व कारखान्यांच्या कर्मचारी व अधिकारी यांना द्यावे. अनधिकृत व्यवसाय व कारखाने तात्काळ बंद करावेत. उद्योग सुरक्षा व आरोग्य संचनालय यांचे सर्व कारखान्यांना तपासणी नियमित करावे व त्या तपासणी मध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात.औद्योगिक सुरक्षा कायद्यामध्ये आवश्यक बदल करावेत. यामध्ये कामगार व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सर्व कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण करण्यासाठी या कारखान्यांना अनिवार्य करावे, असे डॉ.गोऱ्हे यांनी शासनास सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here