Home मुंबई *निवडून आल्यावर प्रकाश दरेकर पहिलाच ठराव,वन जमिनीवरील पिण्याच्या पाण्याप्रश्नी करतील*

*निवडून आल्यावर प्रकाश दरेकर पहिलाच ठराव,वन जमिनीवरील पिण्याच्या पाण्याप्रश्नी करतील*

72
0

*दहिसर येथील कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून विश्वास व्यक्त*

मुंबई- प्रकाश दरेकर यांचा विजय तुमच्या झोपड्यांना, नळाला पाणी पोचविण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारा असेल. या विभागात अद्ययावत रुग्णालय येण्याच्या कामाला गती देणारा असेल.
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाश दरेकर प्रभाग क्रमांक ३ मधून मुंबई महापालिकेत पोहोचणार. निवडून आल्यावर ते पहिलाच ठराव वन जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांच्या पाण्याप्रश्नी करतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या दहिसर (पूर्व) येथील निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमदार आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कॅबिनेट मंत्री आ.प्रवीण दरेकर, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आ. प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, जे. पी. मिश्रा, ऍड. अखिलेश चौबे, श्रीकांत पांडे, मोतीभाई देसाई, महामंत्री सागर पवार, मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, हसीना शेख, रमेश आंबोरे, वॉर्ड अध्यक्ष निकेश तळेकर, आरपीआय वॉर्ड अध्यक्ष राष्ट्रपाल शिरसाट, भाजपा मागाठाणे संयोजक कृष्णकांत दरेकर, यांसह महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेची निवडणूक ९ वर्षांनी होत आहे. २०१७ साली निवडणूक झाली होती. आपला विभागातील सेवक कोण हे तुम्हाला ठरवायचे आहे. ९ वर्षांनी तुम्हाला संधी मिळाली आहे. केतकीपाडा, वैशाली नगर येथील नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे. निवडणुका येतात आणि जातात. पण नागरिक विचारत असतो मतदान करूनही सुविधा मिळत नाही. तुमच्या सुविधांसाठी सतत संघर्ष करून विजय मिळविणारे या व्यासपीठावर आहेत. या भागात पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन पोचवायचे असेल तर वनखात्याची परवानगी लागते. डोक्यावरचे छत राहील की नाही ही भीती मनात घेऊन येथील नागरिक राहत आहेत. मी असा नेता नाही की माझे मातोश्री १ आणि मातोश्री २ बंगले आहेत. घराच्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत तुमच्या घराला कुणीही हात लावणार नाही, असा शब्द शेलारांनी दिला.

शेलार पुढे म्हणाले की, वनविभागाच्या वनजमिनीवरील झोपड्यांना आहे तिथेच पुनर्वसित घर द्या असा सरकारचा ठराव आ. प्रवीण दरेकरांमुळे मंजूर झालाय. काँग्रेस, उबाठाच्या लोकांनी एक तरी कागद दाखवावा, असा सवालही शेलारांनी उपस्थित केला. पाण्यासाठी ना हरकत मागता. काय संबंध आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाश दरेकर प्रभाग क्रमांक ३ मधून मुंबई महापालिकेत पोहोचणार. ते पहिलाच ठराव यापुढे वन जमिनीवरील जागेवर मुंबईकराला पिण्याचे पाणी पोचविण्याचा पाईप टाकायला १५ ते ३० दिवसात वन खात्याने परवानगी दिली नाही तर ती परवानगी आपसूकच दिली जाईल हा ठराव करणार असल्याचेही शेलार म्हणाले.

शेलार पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, पीडितांसाठी संविधान निर्माण केले. आम्ही बोलतो त्याला आधार आहे. गरीब माणसासोबत उभी राहण्याची भूमिका सातत्याने घेतलीय. विरोधकांनी स्वतःचे नेतृत्व सांगावे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी काय काम केले ते सांगावे. धारावीच्या विकासाला विरोध केला तसा तुमच्या पुनर्विकासाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विरोध करतील, असेही शेलार म्हणाले. यावेळी मंत्री शेलार यांनी ‘महायुती एक है, विरोधी सब फेक है. ‘हमारा इरादा नेक है, तुम्हारे साथ चलना हमारा सहयोग का साथ है’, अशी कवितादेखील केली.

तत्पूर्वी आ. प्रवीण दरेकर संबोधित करताना म्हणाले की, मुंबई कशा प्रकारे बदलतेय हे आपण पाहतोय. रस्ते, प्रकल्प, आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी मुंबई चांगली असावी हा प्रयत्न मुख्यमंत्री देवाभाऊ करताहेत. मात्र एका बाजूला टॉवर आहेत, त्यांच्याकडे सुविधा आहेत. परंतु झोपडपट्टीत राहतात त्यांच्याकडे मीटर कनेक्शन घ्यायची अडचण आहे. अजूनही पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागतेय. ५ वर्षाच्या कालावधीत वन जमिनीवरील सर्व प्रश्न निकाली काढणार, असा शब्द दरेकरांनी दिला. तसेच तुम्हाला मूलभूत सुविधा मुख्यमंत्री यांच्याशी, खासदार पियुष गोयल यांच्या बोलून आणि मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आश्वासित केले.

दरेकर पुढे म्हणाले की, ही महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. प्रकाश दरेकर यांच्यासारखा नगरसेवक पदाचा उमेदवार महायुतीने विश्वासाने दिला आहे. केतकीपाड्याचा, शांती नगरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. मी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष आहे. येथील रहिवाशांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची भूमिका सरकार घेईल. विकासासाठी भाजपाच्या कमळाच्या, महायुतीच्या मागे उभे रहा. येथे पाण्यासाठी हफ्ते घेतात. ड्रग्स विकणारे आहेत. लक्षात ठेवा सर्वसामान्य माणसांना त्रास देण्याचा कुणी प्रयत्न केला तर ठेचून काढू, असा इशाराही दरेकरांनी दिला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय तो फुकट घालवू नका. प्रकाश दरेकर यांनी ज्या पद्धतीने प्रभाग क्र. ५ चा विकास केला तसाच प्रभाग क्र. ३ चा विकास करणार. विजयाचा चौकार मारण्याचे काम मतदारांनी करावे आणि प्रचंड मतांनी प्रकाश दरेकर यांना निवडून द्यावे, असे आवाहनही दरेकरांनी केले.

*कोणत्याही अमिषाला, गैरसमजाला फसू नका*

मंत्री शेलार म्हणाले की, “आमचे हृदय तुमच्यासाठी संवेदनशील आहे. बिनविरोध नगरसेवक निवडून आल्याने उद्धव ठाकरे आगपाखड करत आहेत. आपले ६६ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या पोटात दुखत आहे. १४ मे २०२० रोजी स्वतःच उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून आले आहेत. आपल्या तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटं. किती खोटं बोलणार. त्यामुळे यांच्या वक्तव्यांना फसू नका, गैरसमज करू नका. १५ जानेवारीला भविष्याचे स्वप्न देवरुपी पूर्ण करणाऱ्या कमळाचे बटण दाबा.”असे आवाहनही मंत्री शेलार यांनी उपस्थितांना केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here