Home Uncategorized *मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वांनी मैदानात उतरावं – आदित्य ठाकरे*

*मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वांनी मैदानात उतरावं – आदित्य ठाकरे*

83
0

संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावं, असं आवाहन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, किती वॉर्ड निवडून आणायचे हे आपल्या मेहनतीवर अवलंबून आहे, असं ते म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून ज्याची वाट पाहत होतो, तो काळ आता आला आहे.

वरळीमध्ये सादर केलेलं प्रेझेंटेशन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देत, आपण केलेली विकासकामं थेट लोकांपर्यंत नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डिजिटल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असून, मिंधे गट व भाजप दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबईत रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला जातो, मात्र केंद्र सरकार नेमकं काय करत आहे, हा खरा प्रश्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. “ते म्हणतात आम्ही काम केलं, पण आपण केलेली कामं ठोसपणे जनतेसमोर मांडली पाहिजेत,” असं ते म्हणाले.

सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी तीन तास दिल्यास जनतेकडून भरभरून आशीर्वाद मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘वोट चोरी’ हा केवळ प्रचाराचा मुद्दा नसून, त्यामागील सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे जे उमेदवार देतील, त्यांना निवडून आणणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, मशाल हे आपलं चिन्ह आणि लढ्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं.

*“काहीही झालं तरी आपण ही मुंबई महापालिका जिंकायचीच आहे,” असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here