Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *लोकवस्तीतील वंचित मुलांचा नाट्यजल्लोष*

*लोकवस्तीतील वंचित मुलांचा नाट्यजल्लोष*

91
0

ठाणे
लोकवस्तीतील वंचित मुलांचा  रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोष   येत्या रविवारी २१ डिसें.रोजी दादा कोंडके खुला रंगमंच येथे संध्याकाळी ४ वा. होणार असल्याचे संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध नाटककार स्व.रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतील हा वंचितांचा रंगमच असुन या नाट्यजल्लोषाचे हे १३ वे पर्व आहे.

ठाणे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, मानपाडा, किसन नगर, राबोडी, कळवा आदि विभाग आणि घणसोली, केवाणी-दिवे अशा आसपासच्या गावातील अनेक वस्त्यांमधून व शाळांमधील वंचित समाजातील मुली मुले ‘बदलते शहर’ या संकल्पनेवर आधारित त्यांनीच लिहिलेल्या, त्यांनीच बसवलेल्या आणि अभिनय, नेपथ्य, संगीत हे सगळं त्यांनीच केलेल्या नाटिका सादर करणार आहेत.
सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखिका सुप्रिया विनोद उपस्थित राहाणार आहेत  प्रसिद्ध रंगकर्मी चिन्मयी सुमीत, दिपक राजाध्यक्ष, विजू माने, उदय सबनिस, मकरंद जोशी  आदींना संस्थेने निमंत्रित केले आहे.
रसिक ठाणेकरांनी या कार्यक्रमाला जरूर यावे आणि लोकवस्तीतील मुली – मुलांना प्रोत्साहन द्यावे, आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here