Home Uncategorized *सामाजिक बांधिलकी आतातर अत्यावश्यक!*

*सामाजिक बांधिलकी आतातर अत्यावश्यक!*

56
0

*महिलांवरील अन्याय,अत्याचार थांबण्यास सजगता हवीच!*

*संतांचीभूमी,सुधारकांचा ,छत्रपती शिवरांयांचा महाराष्ट्र नक्की कुठल्या दिशेला चाललाय ? असा प्रश्न विचारला ,तर काहीच सांगता येणार नाही कारण इथेही राजकीय, धार्मिक मारामाऱ्या सुरु होतील आणि मूळ विषय मागे पडेल.*
*एकेकाळी ‘सोन्याची चिडिया’ असणारा आमचा भारत देश नक्की काय आणि कसा जगतोय हाही विषय ऐरणीवर येतोच!*
*विषय वैयक्तिक असो की सर्वसामान्यांच्या* *जगण्याचा ,जबाबदारी कुटुंबांची आणि सोबत जागरूक समाजाचीही असते. केवळ घोषणा करणे, सुधारणांचे निर्देश देणे यांनी सन्मानाने जगण्याचे प्रश्नांवर मुळापासून ठोस मार्ग निघत नाही , अंमलबजावणीत गडबड असेल तर मग काहीच खरं नसतं!*
● कायद्याच्या धाकासोबत, सामाजिक एकीचा योग्य दबाव असणे आवश्यक आहे.*
*एखादा खराब, सामाजिक मानसिकता बिघडवणारा विषय असेल तर वेळीच कठोर कारवाई होऊन त्याद्वारे समाजात आणि यंत्रणेत आणि सरकारवरही दबाव येणे हे जागरुक संवेदनशीलतेचे लक्षण आहे.*
*माणूस समाजशील, सामाजिक बांधिलकी जपणारा प्राणी , पण हे बिरुद आता मागे पडतंय की काय असं वाटू लागलंय*
*सार्वजनिक ठिकाणी होणारी जिवघेणी हाणामारी,*
*तडफडून मरणारा माणूस…अशा घटकांपासून अलिप्त राहून त्यांचे मोबाईल नि कशावरही चित्रिकरण करणाऱ्या विकृतांची संख्या वाढलीय, ते कशाला वाघ मानवी वस्तीत शिरून हल्ला करतोय..असं ए आय तंत्र वापरुन वायरल करणारे, विकृत सरकटलेले वाढलेत!*
*आता साधा विषय पहा सामाजिक सहकार्य जगताना अपेक्षित पण हा गाव गावाच्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी अत्याचाराच्या घटनेची तक्रार पोलिसात करु नये म्हणून दबाव टाकतो? …ही कुठली मानसिकता?*
*अत्याचार झालेल्या लेकीने अन्यायाची दाद मागायची नाही? नराधमाला शिक्षा वेळीच होता कामा नये ही कोणती मानसिकता?*
*सध्या अशा एकेक घटना समोर येतात की कधी सुधारणार आपण? असा विषय त्रस्त करु लागलाय!*

*नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या क्रूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, बीड जिल्ह्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली . शिरूर कासार तालुक्यातील एका गावात साडेपाच वर्षीय मुलीवर तिच्या नात्यातल्याच मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडित मुलीवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.*

*७ नोव्हेंबरला ही अत्याचाराची घटना घडली. मात्र, धक्कादायक गोष्ट म्हणजे गावातील लोकांनी गुन्हा दाखल होऊ नये आणि कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून पीडित मुलीच्या आईवर दबाव टाकला.*
*वेदना असह्य होत असतानाही गावकऱ्यांनी बैठका घेऊन पीडितेला ४ दिवस उपचारासाठी जाऊ दिले नाही. गावकऱ्यांच्या धमक्यांमुळे आणि दबावामुळे कुटुंब घाबरले . शेवटी मुलीच्या नात्यातल्यांनी माहिती मिळाल्यावर १३ नोव्हेंबर ला शिरूर कासार पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.*
*महत्त्वाचे म्हणजे इथेही पीडितेसह आईला त्रास झाला. दुपारी १२ वाजता आलेल्या या आईच्या हाती रात्री १० वाजता फिर्याद देण्यात आली. हे प्रकरण आतापर्यंतही दडपले होते. परंतु, मुलीला घेऊन आईने बीड गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला. सध्या या साडेपाच वर्षाच्या लेकीवर जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.*

*या संपूर्ण संतापजनक घटनेबद्दल बोलताना बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोक्सो कायद्याखालील गुन्हा तत्काळ नोंदवून घेतला पाहिजे. गुन्हा नोंद करण्यात दिरंगाई करणे हा देखील गुन्हाच आहे, असे म्हणत त्यांनी शिरूर कासार पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून प्रचंड दबाव होता, पण मुलीची आई मॅनेज झाली नाही आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले, असेही कांबळे म्हणाले.*
*पीडितेची आई आली की गुन्हा दाखल करून घेतला. आरोपी अल्पवयीन असून त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर केले. पुढील कार्यवाही सुरू आहे.-असं प्रवीण जाधव, सहायक पोलिस निरीक्षक यांनी सांगितले…*
*पीडित मुलीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोपी अल्पवयीन असून त्याला बाल न्याय*मंडळापुढे हजर करण्यात आले आहे.पोलिसांनी पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला*
*हा असा दबाव आणण्यामागे काय कारणं असू शकतात.* *तर ,गावात कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून दबाव आणला जातो.गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला शिक्षा होऊ शकते* आणि *कुटुंबाला त्रास होऊ शकतो.समाजात कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून दबाव आणला जातो.*
*पीडितेच्या कुटुंबाला पोलिस आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे दबाव आणला जातो.*
*इथे लोकं आपल्याला मारतील अशी भीती आईला वाटत होती…का बरं? तिथले लोकप्रतिनिधीं ,नेते काय करत होते?*
*ही झाली गरीबाच्या लेकीची, आईची घुसमट आणि अन्यायाच्या कहराची गोष्ट! कसं जगावं सरकार , लेकीसुनांनी?*
*दुसरी घटना श्रीमंत कुटुंबातली,दिल्लीतली!*

*राजश्री पान मसाला आणि कमला पसंद ब्रँडचे मालक कमल किशोर यांच्या सून दीप्ती चौरसिया (४०) यांनी मंगळवारी संध्याकाळी दिल्लीच्या वसंत विहार येथील निवासस्थानी आत्महत्या केली. यानंतर दीप्ती यांच्या कुटुंबियांनी सासरच्या नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. कमल किशोर यांचे सुपुत्र हरप्रीत चौरसिया यांच्याशी दीप्ती यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते. त्यांना १४ वर्षांचा एक मुलगा आहे.*

*हरप्रीत यांचे दुसरे लग्न झाल्यामुळे दीप्ती व्यथित होत्या. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमातील बातम्यांनुसार, हरप्रीत यांनी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीशी लग्न केल्याची चर्चा आहे.*

*वसंत विहार पोलीस ठाण्यात सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दीप्ती यांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात सुसाइड नोटही आढळून आली. मात्र पोलिसांनी अद्याप त्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही.*
*आत्महत्या या जगण्याचा पर्याय नाही हे कोण समजवणार? आई वडील नातेवाईक सगळेच कमी पडतात!*
*ही केवळ “सेलिब्रिटी केस” नाही हे लक्षात घ्या!*
*मानसोपचार तज्ज्ञांनी या प्रकरणावर गंभीर टिप्पणी करत सांगितले की “अशा घटनांकडे केवळ हाय-प्रोफाइल आत्महत्या म्हणून पाहणं चुकीचं आहे. हे समाजात वाढत चाललेल्या मानसिक छळ, एकाकीपणा आणि वैवाहिक अपयशाचं भयावह चित्र आहे.”*

*तर तिसरी बातमी आपल्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातली…मुळशी पॅटर्न, गँगवॉर मुळे पुणे नामचीन झालय. बातमीच तशी विचित्र आहे..नक्की हे खरं असेल का? अशी चर्चा दिवसभर सर्वत्र सुरु आहे.*

*महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध देऊन नंतर ब्लॅकमेल करणारी स्वतःला वकील आहे असं भासवणारी महिला आहे ही.याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*
*पीडित तरुण कोल्हापूरचा आहे. आरोपी महिलेने गुंगीच औषध देऊन तरुणावर लैंगिक अत्याचार केला. महिला पुण्यातील रहिवासी असून आपल्या घरीही तिने त्याच्यावर बळजबरी केली. इतकंच नाही तर कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरीदेखील प्रयत्न करण्यात आला,तिने तरुणाला बळजबरीने काशी विश्वनाथला नेऊन अत्याचार केले होते.*
*पुरुषावर अत्याचार करताना अश्लील फोटो तिने कॅमेऱ्यात कैद केले. नंतर याच फोटोंच्या आधारे तिने पैसे मागण्यास सुरुवात केली होती. पैसे दिले नाही तर खोट्या केसमध्ये अडकवेन अशी धमकीही तिने दिली होती. पीडित तरुणाने याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास केला जात आहेत…कठीण आहे सगळं ! गुंगीचं औषध देऊन महिला अत्याचार करते? हा तर विचार करण्याचा विषय आहे…पण सध्या या विषयावर काय बोलावं तेच कळत नाही!..अजुनही हे खरं वाटत नाही…पण या कलियुगाच्या कहर काळात काहीही होऊ शकतं , निर्दोष निष्पाप भरडले जाऊ शकतात!*
*या आणि अशा विषयावर खूप काम करणे आवश्यक आहेच!*
*महिला व बालविकास विभाग,महिला आयोग, पोलिसांचा सामाजिक सहायता विभाग, निवडून व निवडलेल्या लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांची एक सक्षम साखळी गावांपासून शहरापर्यंत बांधली जाणे, सामाजिक स्तरांवर मनोधैर्य वाढवणे, सक्षम महिला पोलिसांची टिम बालकल्याण विभागाने तयार करणे गरजेचे आहे.*
*गाव तक्रार करु नये म्हणून दबाव टाकतो आणि आईला आपल्यावरच अन्याय होणार असे वाटणे हे कशाचं लक्षण आहे.* *निवडणूकीत आपण निवडून यावं म्हणून लढणारे आपल्या परिसरात हो असे घडत असताना पुढाकार का घेत नाहीत ? की फक्त सिनेमातच आपण गावाला रक्षण देणारे गावाचे नेते पहाणार?*
*कुठे चाललोय आपण? आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या महिलांचं रॅकेट मागील अधिवेशनात चर्चेत आलं होतं, पुढे काय झालं त्याचं कळलंच नाही.*
*एकूणच हे लेकी सुरांचे विषय हलक्या घेण्यासारखे अजिबात नाहीत. पण लक्षात कोण घेतोय? पण आपली नागरिक म्हणून जबाबदारी आपण विसरुन चालणार नाही… वेळ आली की बोलणं ,पीडितांना आधार देणं, मनोधैर्य वाढवणं हे आपणही काम आहेच!*

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here