Home Uncategorized मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर

मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर

55
0

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वीरगतसेच भग्गाव परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची आज इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा, दुग्धविकास, दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ना. सावे यांनी आज वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. वीरगाव परिसरात मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून भग्गाव परिसरात सोयाबीन, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे भरीव मदत देण्याची ग्वाही, ना. सावे यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here