Home Uncategorized शेंदूर उडालेल्या दगडांनी “सिन्दुर”ची काळजी करू नये ! – – खा नरेश...

शेंदूर उडालेल्या दगडांनी “सिन्दुर”ची काळजी करू नये ! – – खा नरेश म्हस्के

69
0

अबुधाबी येथे चौदा तारखेला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उबाठा चा विरोध
यावर शिवसेना प्रवक्ते खा. नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला.
ते म्हणाले की,”
“पाकिस्तानबाबतच्या देशाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोवर दोन देशात सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. ही एनडीए भूमिका होती व आजही तीच भूमिका आहे. आशिया चषकात एक क्रिकेट सामना खेळल्याने त्यात बदल झाला असे म्हणणे चुकीचे आहे. दोन देशात क्रिकेट नाही तर कोणतेच सामने होत नाहीत. पाकिस्तानी खेळाडूंना अजूनही आयपीएल चे दरवाजे बंद आहेत. मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा (टूरनामेंट) होतात तेव्हा पूर्वीही असे सामने झाले आहेत. विश्वचषकात आपण खेळलो आहोत.”

“प्रश्न राहिला तो उबाठा च्या विरोधाचा…ते रोज आमच्याविरोधात उर बडवत असतात. परंतु पंतप्रधानांबाबत बोलताना आपण काय शब्द वापरतो त्याचे भान ठेवले पाहिजे. आपली पात्रता, कुवत ओळखून बोलले पाहिजे. ज्या लोकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या सोबत सत्तेत बसणे याला निर्लज्जपणा म्हणतात. हिंदुत्वाचा विचार सोडून सत्तेसाठी लाचारी स्वीकारण्याला निर्लज्जपणा म्हणतात. मुंबईच्या गुन्हेगाराला, बॉम्बस्फोटातल्या आरोपींना प्रचारात घेऊन फिरण्याला निर्लज्जपणा म्हणतात.

शेंदूर उडालेल्या दगडांनी “सिन्दुर”ची काळजी करू नये !

खरे तर ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत संशय व्यक्त करणाऱ्या, देशाच्या जवानांनी गाजवलेल्या शौर्यावर शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना सिंदूर बाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांनी सिंदूरचा अवमान केला आहे. आता निवडणुका आल्याने त्यांना सन्मान शब्द आठवला का ? निवडणूक प्रचारात आयएसआय च्या हस्तकांना व बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरणाऱ्यांनी सिन्दुर सारखे पवित्र शब्द उच्चारू ही नयेत. देशाचे संरक्षण करण्यासाठी मोदी आणि शाह यांचे नेतृत्व समर्थ आहेत. बाजारबुनग्यांनी त्याची चिंता करू नये. माझं कुंकू, माझा देश…. असे अभियान राबवणार आहेत…….

२०१९ ला “एकाशी लग्न, दुसऱ्याशी संसार” हे अभियान राबवले होते. आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या कुवतीच्या पलिकडचा विषय आहे. काँग्रेसकडून आलेला कागद वाचून दाखवतात.

पहलगामचा हल्ला झाला तेव्हा हे परदेशात टूर करत होते. एकाकी पीड़ित बहिणीची विचारपूस केली नाही.
कॉग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले होत असताना भारत पाकिस्तानात जाऊन क्रिकेटचे सामने खेळला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here