Home Uncategorized *अंबोली (अंधेरी) येथील हिंदू स्मशानभूमीतील अद्ययावतीकरण कामांमुळे लहान मुलांसाठीची दफनभूमी तीन महिने...

*अंबोली (अंधेरी) येथील हिंदू स्मशानभूमीतील अद्ययावतीकरण कामांमुळे लहान मुलांसाठीची दफनभूमी तीन महिने कालावधीसाठी तात्पुरती बंद राहणार*

115
0

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागातील अंबोली (अंधेरी) हिंदू स्मशानभूमी येथे अद्ययावतीकरण कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे या स्मशानभूमीतील लहान मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशाभूमीतील दफनभूमीची सुविधा तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत परिरक्षण विभागामार्फत अंबोली स्मशानभूमीचे अद्ययावतीकरण / पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. स्मशानभूमीतील ही कामे पूर्ण झाल्यानंतर याठिकाणची लहान मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी दफनभूमीची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तोवर, ओशिवरा हिंदू स्मशानभूमी आणि ढाके वसाहत हिंदू स्मशानभूमी येथे दफनभूमीचा पर्याय उपलब्ध आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here