Home मुख्य बातम्या मनसे ‘राज’ प्रचार पाठिंबा प्रयोग कुणाच्या हितासाठी?

मनसे ‘राज’ प्रचार पाठिंबा प्रयोग कुणाच्या हितासाठी?

183
0

मनसे ‘राज’ प्रचार पाठिंबा प्रयोग कुणाच्या हितासाठी?

(शीतल करदेकर )

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा परप्रांतियांचा  मुद्दा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मागे पडला आणि राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले.

हिंदुत्वाच्या विषयावर  त्यांनी पक्षाची तयारी केली! लोकसभा  निवडणुकीत राज ठाकरे भाजपाच्या बाजूला गेले!

 राज्यात त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार नसल्यामुळे कदाचित युतीच्या कळवा येथील भाषणात  राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतीय मुद्दा उचलला ! तिथे भाजपाचे उमेदवार असते तर हा मुद्दाच उचलला नसता अशी जोरदार चर्चा सुरु आहे!

ठाणे आणि कल्याण मध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात राहत असून राज ठाकरे यांनी पुन्हा हाच मुद्दा उपस्थित करून श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचे टेन्शन वाढवले आहे!

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रांताचे लोक राहतात हे राज ठाकरे यांचे विधान गांभीर्याने घेतात का ते पाहावे लागणार आहे?

ठाणे शहर एकेकाळी तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते आता यांचे काँक्रीट जंगल झाले असे टोलाही  राज ठाकरे यांनी लगावला.

*मला कुठे फेविकॉल लागले ?*

श्रीकांत शिंदे यांनी मनसे आणि शिवसेना शिंदे गट हा फेविकॉल का जोड आहे असं वक्तव्य  केलं !

त्याचा उल्लेख करून राज ठाकरे म्हणाले  की, फेविकॉलचा जोड पुढच्या वेळी आतून लावा, नाहीतर आमची बाजू नेहमीच बाहेरची राहील , आमचा बाहेरून पाठिंबा आहे ! आम्हाला अजून कुठे फेविकॉल लागलाय असं म्हटले.

एकूणच हा मनसे ‘ राज ‘ प्रयोग प्रचारासाठी किती कामी आला यावर भाजपा व एकनाथ शिंदे गटात चिंतन नक्कीच होईल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here