Home मुंबई बदल करायचाय, भाजपाला बाहेर काढायचं – आदित्य ठाकरे

बदल करायचाय, भाजपाला बाहेर काढायचं – आदित्य ठाकरे

183
0

*बदल करायचाय, भाजपाला बाहेर काढयचय*

*जेव्हा जेव्हा हरायला येतात, तेव्हा जाती जाती-धर्मा धर्मात तेढ निर्माण करतात*

*चिखलात कमळ फुलतो, म्हणून चिखल करायचा ?*

*दक्षिण मद्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनिल देसाई आणि ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी प्रतीक्षा नगर आणि भांडुप येथे सभा संपन्न झाली या वेळेस मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

                 यावेळी बोलताना ‘गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारकडून मुंबईवर, महाराष्ट्रावर झालेला अन्याय लक्षात ठेवून, आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहचण्यासाठी आपले उमेदवार अनिल देसाई आणि संजय दिना पाटील ह्यांनाच निवडून देण्याचे, आवाहन उपस्थित नागरिकांना आदित्य ठाकरे यांनी केलं .

*बदल करायचाय, भाजपाला बाहेर काढायचं*

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत . या निर्णयात बदल अपेक्षित आहे . 20 तारखेला सर्वांनी मतदान करा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केलं . कारण बदल करायचा आहे ,भाजपाला बाहेर काढायच आहे . भाजपा म्हणते  400 पार पण आता 200 पोहोचणेही कठीण, अबकी बार भाजपा तडीपार . हा नारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय . भाजपा वाले घरी आले तर त्यांना चहा पाजा आणि विचारा 400 कुठून येणार ? भाजपा जेव्हा जेव्हा हारायला येते. तेव्हा ते जाती जाती धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करतात . अशी टीका करतानाच मुंबईत महाविकास आघाडी सहाच्या सहा जागा निवडून येणार असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला . त्याच बरोबर भाजपाला दक्षिण भारतातून एकही सीट मिळणार नाही, मग 400 कुठून येणार ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला .

*ही निवडणूक आपल्यावर जो अन्याय झाला, त्याचा वचपा काढणार की नाही ?*

केद्र सरकारकडून केंद्रीय आस्थपनांचा केल्या जाणाऱ्या वापरावर आदित्य ठाकरेंनी टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘बिहारमध्ये तेजस्वी यादव लढत आहेत . मध्ये गद्दारी झाली, पण तेजस्वी यादवची सभा बघा ! अभूतपूर्व होत आहेत . काश्मीर मध्ये ३७० काढले पण भाजपाला विचारा आतंकवाद संपला का ? ३७० कलम हटवले पण काश्मिरी पंडिताना घर मिळाले का? हल्ले का होत आहेत ? लदाख मध्ये लोक म्हणतायत आम्हला धोका दिला म्हणून.  लदाखचे भाजपाचे खासदार लोकांची माफी मागत आहेत .  लडाख मध्ये निवडणूक का घेत नाही ? , तिकडे केजरीवाल यांना आत टाकल , आणि ईडी म्हणजे भाजपाचे सहयोगी आहेत . पण आता देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत. आता ही निवडणूक आपल्यावर जो अन्याय झाल आहे, त्यात वचपा काढणार की नाही ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला .

*मुंबई मॉडेल जगाला मान्य, पण विरोधकांना नाही*

उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आलेलं महाभयंकर संकट कोरोना रोखण्यात वापरलेल मुंबई मॉडल ज्याचं जगाने कौतुक केलं, त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ,’कोव्हिड मध्ये पारदर्शक कारभार केला, खरे आकडे सांगितले ते मुख्यमंत्री उद्भव ठाकरे होते, मुंबई आपण वाचवली . एवढंच नव्हे ते WHO ला धारावी मॉडल बद्दल बोलावं लागलं. तिकडे सूरतमध्ये अंबुलेंस मिळत नव्हती, उत्तर प्रदेश मध्ये प्रेत रस्त्यावर पडले होते . मुंबई मॉडेल जगाला मान्य आहे, पण विरोधकांना नाही . असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली .

               तसचं कोस्टल रोड मुंबई मनपाचा प्रकल्प होता, उद्भव साहेबांच स्वप्न होत, यात भाजपचा काही सबंध नाही . तसचं हिंद माता इथे पाणी तुंबायच, तो प्रश्न पूर्ण मिटवला . हे शिवसेनेचे श्रेय आहे . आपण मुंबई महापालिका टॅक्स न वाढता ९२ हजार कोटी सर प्लस मध्ये आणली . बेस्ट साठी आपण काम केले . माझ्यावर डबल डेकर बस मध्ये भ्रष्टाचारचा आरोप केला . पण हे लोक उद्घाटनला पुढे आले. जगात सर्वात परवडणारी बस सिस्टम आपण केली . जनतेला ५०० स्क्वेअर फूट घरं कर मुक्त केली . पण भाजप मुंबई आणि महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत . अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here