Home महाराष्ट्र खोके, धोके देवून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली- आदित्य ठाकरे

खोके, धोके देवून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली- आदित्य ठाकरे

174
0

खोके, धोके देवून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली- आदित्य ठाकरे*

आता प्रचार १० वर्षात काय केलं यावर नाही, तर विरोधकांवर टीका करून सुरूये*

*रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी मुरुड(रायगड), मंडणगड (रत्नागिरी) येथे सभा संपन्न*

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांची रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी रायगड आणि रत्नागिरीच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी मुरुड आणि मंडणगड येथे आयोजित सभेत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली . या प्रचार सभेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी भर उन्हातही मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित राहून मुरुड-जंजिरा येथील स्थानिकांनी, शिवसैनिकांनी; ‘देशात मूळ धरत असलेली हुकूमशाही दूर करून ठाकरेंची मशाल दिल्लीपर्यंत सर्वसामान्यांचा आवाज पोहचवणारच,’ ह्याची ग्वाही दिली .

*इंडिया आघाडीचे सरकार दिल्लीत बसणार !*

रायगड मधील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसेल हा विश्वास व्यक्त केला , तसचं बोलताना ते म्हणाले की ‘आज जे चित्र इथं दिसतय तेच राज्यभर आहे . आपल्याला सांगत होते अबकी बार चारसो पार . पण आता भाजप एक्सपोज होत आहे . 200 पर्यंत तरी जातील की नाही अशी शंका आहे. तुमचे 400 कुठून येणार ते सांगा . आज देशातील चित्र परिवर्तनाचे आहे . साऊथ से साफ, नॉर्थ मे हाफ अशी स्थिती आहे .वेगवेगळ्या राज्यातील रिपोर्ट सांगतात परिवर्तन होणार , इंडिया आघाडीचे सरकार दिल्लीत बसणार , असं चित्र निर्माण झालंय . हे चित्र पाहिलं तर 400 आणणार कुठून , चंद्रावरून का ?. आता एन डी ए वर आले आहेत. गेली 2 ते अडीच वर्षे महाराष्ट्राचा छळ सुरू आहे. ही लढाई देश विरुद्ध भाजप अशी होवून बसली आहे. असं म्हणत भाजपावर घणाघात केला .

*आता प्रचार 10 वर्षात काय केलं यावर नाही, तर विरोधकांवर टीका करून सुरूये*

सभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘आता भाजपचा प्रचार 10 वर्षात काय केलं यावर नाही, तर विरोधकांवर सुरू आहे . आता धर्म जात यावर बोलू लागलेत . मटण मांसावर बोलताहेत . 2 कोटी रोजगार मिळणार होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, पण कुणाच्या खात्यात 15 लाख आले ? ज्या पक्षाने 10 वर्षे राज्य केलं त्यांनी मटण, हिंदू मुस्लिमवर बोलावं का ? या देशात नोट बंदीचा फायदा कुणाला झाला ? आता पुन्हा नोट बंदी करतील अशी चर्चा आहे . देशात भयानक स्थिती आहे . त्यात निर्मला सीतारामन म्हणतायत 4 जातींचा शोध लागला आहे .  शेतकरी, गरीब, युवक, महिला . मग 10 वर्षात हे दिसले नाही . या 4 वर्गांची काय स्थिती आहे ? शेतकरी खुश आहे का ? असा सवाल जनतेला करतानाच भाजपा सरकावर हल्लाबोल केला .

*विरोधकांच्या मागे ED, CBI लावणारे रेवांनाच्या मागे का लागले नाही ?*

तसचं राज्य सरकारवर बोलताना ‘उद्धव ठाकरेंनी कर्ज मुक्ती दिली ती पोहोचली . पण आता मींधे सरकारमधील कृषी मंत्र्यांचे नाव माहीत नाही . एकही वचन पूर्ण केले नाही.  शेतकऱ्यांना अतिरेकी, खलिस्तानी बोलतात, त्यांच्यावर लाठी चार्ज , अश्रुधुर सोडल्या . या देशात महिला सुरक्षित आहेत का ? बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींना बाहेर आणलं त्यांची आरती केली, प्रचारात फिरवलं, रेवंना रेप प्रकरण लाज वाटते त्याला का पकडुन आणलं नाही? विरोधकांच्या मागे ED, CBI लावणारे रेवांनाच्या मागे का लागले नाही ? मंत्र्याने सुप्रिया ताईंना शिव्या दिल्या तो सीएमच्या मांडीला मांडी लावून बसलेत . असं म्हणत राज्य सरकारचा देखील समाचार घेतला .

*खोके, धोके देवून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली- आदित्य ठाकरे*

देशात युवा वर्ग महत्त्वाचा आहे . पण तरुणांची स्वप्न चिरडली जातायत, नवीन नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत .आपले उद्योग गुजरातला पळवले . वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरातला गेले . आज तरुण विचारतोय सगळच गुजरातला गेलं तर आम्ही जायचं कुठे . पोस्टिंग साठी बोली लावतात. तिकीट वाटप गुजरात मधून झालं की काय अशी चर्चा आहे . या देशात खुश कोण आहे ? आज देश वाचवणे गरजेचे आहे, आणि  ते मतदाराच्या हातात आहे . भाजपला संविधान का बदलायचे आहे ? पण भाजपचे सरकार आता बसत नाही म्हणजे नाही . खोके धोके देवून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली . आणि आता भाजप येत नाही, पण त्यासाठी तुम्ही मतदान करणे गरजेचे आहे . असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here