Home महाराष्ट्र आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात- खासदार सुप्रिया सुळे

आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात- खासदार सुप्रिया सुळे

166
0

आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात- खासदार सुप्रिया सुळे

बारामती – आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रतिभा पवार, सुनंदा पवार, शर्मीला पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्षा भारती  शेवाळे, आमदार रोहित पवार, बारामती तालुकाध्यक्षा वनिताताई बनकर, इंदापूर तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, दाैंड तालुकाध्यक्षा योगिनी दिवेकर, पोर्णिमा तावरे, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, सक्षणा सलगर, प्रियंका शेंडकर, विकास लवांडे, संगीता ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ बारामती येथे आयोजित महिला मेळाव्याला  उपस्थित महिलांशी संवाद साधताना आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात, त्यातही नाते तोडण्यापेक्षा ते नाते जपणे जास्त अवघड असते, असे सांगितले. सुनंदा वहिनींंमध्ये मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असे तिन्ही गुण आहेत, पण काहीजण याचे भान न ठेवता टिका करतात, हे दुर्देवी असल्याचे सांगितले. माझ्या कुटुंबांवर आज टिका केली जात आहे. त्या टीकेची उत्तरे माझ्याकडे आहेत, पण मी ते देणार नाही, कारण माझ्यावर नाती जपण्याचे संस्कार झाले आहेत. पण मी उत्तर देत नाही म्हणून त्याचा अतिरेक करु नका, नाही तर सहनशीलतेलाही मर्यादा असते, त्यामुळे परत टिका कराल तर ‘करारा जवाब’ मिळेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. बदल तिकडे हाजी करून होणार नाही. मी तुमच्यासाठी लढणार असल्याचे त्या म्हणाल्या.  आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार साहेब असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होतं असतो कामे फक्त सत्तेतून होतात असे सांगितले जाते, १० वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो. वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढं आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकं म्हणतात एका विचाराचा खासदार पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार होतं तरी गुजरातमध्ये गुजरात शायनिंग झालं की नाही? विरोधात असले तरी कामे करता येतात. लोकांशी चांगले वागलं की कामे होतात. विरोधी पक्षात आल्यापासून जास्त टाळ्या आता मिळतात. माझा बाप थकला नाही श्रमलेला आहे. सुखाच्या काळात सोबत राहिलो तर रोहित आईसाठी करतोय तसा मुलगा माझा करेल असं माझी आशा आहे, माझी मुलगी गुणी आहे.असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार कृषी मंत्री असते तर कांद्याला,  दुधाला दर मिळाला असता. शेतकऱ्याचे कर्जमाफ झाले असते. २०१४ मध्ये आमची आई म्हणायची तुमचे सरकार येत नाही आणि खरंच सरकार नाही आलं. आमच्या आईची आता कटकट वाढली आहे. आता ती म्हणते आता सरकार जाईल, महागाई वाढली आहे. आपण बुथवर सिलेंडर ठेवू, आपण नमस्कार करून जाऊ. हे म्हणतात विकासासाठी मत द्या, अरे कुणाचा विकास झाला? विकास तर यांचा झाला. असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलांमध्ये माहेर आणि सासर अशी दोन्हींची जबाबदारी घेण्याची ताकत असते. त्यामुळे मी त्यांची टीका आणि आरोपांना जास्त महत्व देत नाही, कारण माझ्यासाठी देश प्रथम, नंतर राज्य, त्यानंतर पक्ष आणि शेवटी कुटुंब आहे. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार  म्हणजे बारामती हे त्रिवार सत्य आहे. पवारांनी शून्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, याची आठवण करुन दिली. त्याचबरोबर मी कधीही विकासकामाचे श्रेय एकटी घेत नाही, कारण विकास हा एकत्र मिळून केला जातो, एकट्याने होत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशासमोर आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या समस्या आहेत. महागाईची झळ काय असते, याची महिलांना खरी जाणीव असते. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि तरूणांचा हाताला रोजगार देण्यासाठी आगामी निवडणूकीत तीन नंबरवरील ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विशेष म्हणजे मी विरोधी पक्षाची खासदार आहे तरीही केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविण्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ पहिला आला आहे. त्यामुळे सत्तेत असल्यावरच विकास होतो, असे म्हणतात, ते चुकीचे असल्याचे सांगितले. आणि  डॉ . मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना जर गुजरातचा विकास होऊ शकतो, तर मग आत्ताच केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार असेल तरच विकास होऊ शकतो, असा शोध कोणी लावला, कारण कामे करून घेण्याचीही एक पद्धत असते असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here