*शिक्षणात भाषेचं धोरण राबवताना शिक्षणतज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं*- *खा. सुप्रिया सुळे*
मुंबई दि. २४
शिक्षण हा अतिशय गंभीर विषय असून तो आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही असो, या विषयात राजकारण न आणता शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य निर्णय घेतला पाहिजे.”अशी स्पष्ट भुमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडली .
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की,”शिक्षण हा अतिशय गंभीर विषय आहे. नवीन शिक्षण पॉलिसी सोपी असावी. मी स्वतः एसएससीमध्ये शिकले आहे. एसएससीमध्ये पहिली ते चौथी दोन भाषा आहे. त्यामध्ये बदल करण्याचा कारण काय? बदल करण्यासाठी काही डेटा, पुरावे पाहिजे. फक्त मनमर्जीने बदल करता येत नाही.”
निवडणुक आयोगाबद्दल त्या म्हणाल्या की
” जर निवडणूक आयोगाने चर्चेसाठी बोलावले असेल तर जायला पाहिजे. शेवटी एका सशक्त लोकशाहीत चर्चेनेच मार्ग निघतात. आज अनेक प्रश्न आहे , यावर चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. आजकालच्या जगात जेवढे क्लाऊड सेंटर आहे त्यामुळे डेटा कायम ठेवणे हे काही मोठे काम नाही. निवडणूक आयोगाने पारदर्शक काम केले पाहिजे. बारामतीमध्ये सुद्धा पैसे वाटल्याप्रकरणी चर्चा सुरु आहे त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकप्रमाणे काम झाले पाहिजे.” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.






















