Home Uncategorized *केवळ नोकरीसाठी नव्हे ,तर जीवन जगण्यासाठी शिक्षण हवे ,जे फँसिझमविरुद्ध उभे राहील…स्वरा...

*केवळ नोकरीसाठी नव्हे ,तर जीवन जगण्यासाठी शिक्षण हवे ,जे फँसिझमविरुद्ध उभे राहील…स्वरा भास्कर*

84
0

केवळ नोकरीसाठी नव्हे ,तर जीवन जगण्यासाठी शिक्षण हवे ,जे फँसिझमविरुद्ध उभे राहील .शोषितांच्या बाजूने बोलेल आणि न्याय्य व मानवतावादी समाज घडवेल.
हे विद्यार्थी आपले भविष्य आहेत. त्यांना राजकीय जाण आणि धैर्य हवेच असे प्रतिपादन अभिनेत्री स्वराभास्कर हिने केले.
ए आय एस एफ मुंबईतर्फे आयोजित सफाई कामगारांच्या मुलांचा गौरव कार्यक्रमात केले.
कॉ. मिलिंद रानडे व कॉ. शुकुमार दामले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
सोमवार दिनांक ८जुन रोजी
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) – मुंबई तर्फे “शहीद कॉ. हेमू कलानी विद्यार्थी सन्मान समारंभ” उत्साहात आणि स्फूर्तीदायक वातावरणात पार पडला. मुंबईतील सफाई व मेंटेनन्स कामगारांच्या १०वी व १२वी उत्तीर्ण मुलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
भूपेश गुप्ता भवन, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात ५१ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम कॉ. आमिर यांच्या ओजस्वी आणि भावनिक सूत्रसंचालनात पार पडला.

मुख्य पाहुणे म्हणून स्वरा भास्कर, तसेच ज्येष्ठ कामगार नेते कॉ. मिलिंद रानडे आणि कॉ. शुकुमार डांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
AISF कार्यकर्त्यांचे योगदान:
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील कॉम्रेड्सचे मोलाचे योगदान लाभले:
कॉ. संगीता पाटवा, कॉ. आदित्य, कॉ. आसिफ खान, कॉ. रोजुमोन, कॉ. अदनाम, कॉ. जय, कॉ. आफताब, कॉ. अब्बास, कॉ. स्वप्निल इत्यादी.
सामाजिक कार्यकर्ते समीर वागळे, संध्या गोखले, मयूर येवले, डॉ. अनिता पाटील, कॉ. चारुल जोशी, कॉ. अनुराधा रेड्डी, कॉ. दादाराव पाटेकर, कॉ. रुपाली यांचीही उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here