मुंबई, दि. 31
छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सारख्या महान योध्दे, उपभोग शून्य राजांचा गौरवशाली इतिहास स्वातंत्र्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडलाच नाही.,
असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केले.
पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने सांस्कृतिक विभागातर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यातील एक कार्यक्रम प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे झाला. अहिल्याबाई होळकर यांचा जीवन पट उलगडून दाखवणारा गीत संगीत आणि पोवाडा, शायरी असा हा बहादार कार्यक्रम सादर करण्यात आला.
सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय, माजी आमदार भाई गिरकर, सुनील राणे आणि सांस्कृतिक विभागाचे संचालक विभिषण चवरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना एँड आशिष शेलार म्हणाले की, पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांची सनद ही रोज वाचून मस्तकी लावावी अशीच आहे. एक आदर्श जीवनपद्धतीचा वस्तूपाठ महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या घालून दिला, मला प्रत्येक गोष्टीचा हिशेब भगवंताला द्यायचा आहे, असे विचार मांडून समानतेचे, मरसतेचा, स्त्रीला समान अधिकार देणारा राज्य कारभार अहिल्याबाई होळकर यांनी केला. त्यामुळे आज जगात ज्या समानतेच्या गोष्टींची चर्चा होते आहे त्याचा उगम आणि पुरस्कार किंबहुना पायाभरणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या देशात केव्हाच केली होती, असेही एँड शेलार यांनी नमूद केले.
दरम्यान,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त मुंबई भाजपातर्फे मुंबईत ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
भाजपा ईशान्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य शोभायात्रा तर खार येथे महाआरती, तसेच दहिसर येथे शोभायात्रा तसेच सांस्कृतिक कार्यमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून एँड आशिष शेलार सहभागी झाले होते.
यावेळी आमदार मिहीर कोटेचा, संजय उपाध्याय, मनिषा चौधरी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दिपक दळवी, उत्तर मुंबईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



















