*सरकारने जाहीर केलेला 100 दिवसांचे* *मूल्यांकन हे फसवं आणि धुळफेक करणारे*
*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे टीकास्त्र*
मुंबई – सरकारने 100 दिवसांचा विभागांचे केलेलं मूल्यांकन हे फसवं आणि धुळफेक करणार आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीवरील मूल्यांकनावर टीकास्त्र डागले.
एकप्रकारे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने हा मूल्यांकनाचा घाट घातल्याचा आरोपही दानवे यांनी केला. सरकारने त्यांच्या कामकाजाच मूल्यांकन जनतेकडून घ्यावं, त्यानंतर त्यांना त्यांची क्षमता कळेल, असे दानवे म्हणाले.
सरकारने एप्रिल महिन्यात विभागांच्या केलेल्या गुणांकात एका महिन्यात वाढ कशी केली असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना पक्षात गद्दारी झाली त्यावेळी त्या आमदारांना सुरतला घेऊन जाणारे बाळासाहेब पाटील होते. राज्यात गुटखा, ड्रग्स बंदी
असताना गुजरातमधून अवैधरित्या पालघरमध्ये आणला जातो. त्यांनी वारंवार नियमबाह्य बदल्या केल्या असल्याच्या तक्रारी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात असताना त्यांना पोलीस अधीक्षक म्हणून मूल्यांकन देताना क्रमांक 1 दिला आहे. ते कशावरून दिला हे स्पष्ट होत असल्याचे दानवे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिलांना वगळले आहे. पिंक रिक्षा उपक्रम अयशस्वी ठरला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे, इत्यादी विषय महिला व बालविकास विभागाने दुर्लक्ष केले असताना या विभागाला पहिला क्रमांक कसा काय दिला यावर दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना 40 टक्के पगार देणाऱ्यांना गुणांकन कसं दिल जातं?
राज्यात विविध ठिकाणी 2100 महिला अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये एप्रिल महिन्यात 14 हत्या भररस्त्यात करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
कृषी विभागाने 1 रुपयांत पीक विमा बंद केला.
मराठवाड्यात 289 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ न केल्यामुळे म्हणून कर्ज थकवल आहे, त्यामुळे
बँका कर्ज देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचे टेंडर नवीन सरकारकडून थांबविण्यात आले. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना
जनतेच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.



















