बुधवार दिनांक १७ एप्रिल २०२४ चैत्र शुद्ध नवमी शके १९४५ रोजी प्रभू श्रीराम नवमी निमित्त सकाळी ०७:३० ते ०९:३० वा. प्रभू श्रीरामचंद्राची षोडषोपचार पूजा व पवमान पंचसूक्त अभिषेक श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे जेष्ठ पुजारी श्री बाळकृष्ण दत्तात्रय सप्रे यांच्या हस्ते करण्यात आली.त्याचप्रमाणे कीर्तनकार ह.भ.प. सिद्धेश बुवा मणेरीकर यांच्या कडून प्रभू श्रीराम जन्माचे कीर्तन करण्यात आले. त्याप्रसंगी न्यासाचे विश्वस्त श्री सुनिल पालवे,श्री राजाराम देशमुख, कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा मोरे पाटील यांच्या उपस्थित रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.



















