Home मुंबई *कोकणाचा विकास व्हायचा असेल तर* *सहकारातून रचनात्मक काम करू या* ...

*कोकणाचा विकास व्हायचा असेल तर* *सहकारातून रचनात्मक काम करू या* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे युवा पीढिला आवाहन*

124
0

*कोकणाचा विकास व्हायचा असेल तर*

*सहकारातून रचनात्मक काम करू या*

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे युवा पीढिला आवाहन*

महाड – मी महाराष्ट्रातील सूत गिरण्या, शिक्षण संस्था, कारखाने यांना मदत करतो. परंतु कोकणातील एकही माणूस उद्योगासाठी पुढे येत नाही. कारण तो धोका पत्करत नाही. तालुक्यात झोकून देऊन काम करणारी फळी निर्माण झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रविण दरेकर निर्माण झाला पाहिजे. तरच सहकाराच्या माध्यमातून कोकणाचा विकास होईल, असे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी युवा पीढिला केले.

आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षानिमित्त महाड येथील जनकल्याण सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आ. दरेकर बोलत होते.. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अजय जोगळेकर, उपाध्यक्ष दिलीप पार्टे, सहाय्यक निबंधक तुषार लाटणे, महाड पोलादपूर भाजपा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, पतसंस्थेचे संचालक अनिल गोरेगावकर, रविंद्र पांडे, प्रकाश कोळवणकर, सुनिल पलंगे, समीर बुटाला, ममता मेहता, वैशाली भिडे, सुधीर महाडिक, संदीप ठोंबरे, प्रसन्न पालांडे, महेश शिंदे यांसह सहकारातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्रला सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. १९९० नंतर सहकार क्षेत्राला जी गती मिळायला हवी होती ती मिळाली नाही. आज सहकाराला खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची गरज आहे. कोकणात सहकार चळवळ रुजली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जो विकास झाला त्यात सहकाराचे मोठे योगदान आहे. अनेक सहकारी संस्था, सहकारी सूत गिरण्या उभ्या राहिल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून मदत करण्याचे काम त्या ठिकाणी चालते. दुर्दैवाने कोकणात सहकाराला गती मिळाली नाही. योग्य मार्गदर्शन नसल्याने ज्या प्रकारे प्रगती व्हायला हवी होती ती होऊ शकली नाही. राज्यात ३६ जिल्हा बँका आहेत. त्यातील उत्तम ६ बँका कोकणातील आहेत, याचा अभिमान असल्याचे दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, विदर्भातील बँकांत घोटाळे झालेले दिसतील. त्या बँका एकतर डबघाईला आल्यात किंवा बंद अवस्थेत आहेत. कोकणच्या कार्यकर्त्यांनी ठरवले तर जिल्हा मध्यवर्ती बँक चालवू शकतो. जनकल्याण पतसंस्था अडचणीत आली होती. आता ती बँक चांगल्या अवस्थेत आहे. आपली संस्था मजबूत झाली पाहिजे असे आपल्याला का वाटत नाही? असा सवाल करत दरेकर म्हणाले कि, सहकारात प्रचंड ताकद आहे. मी सहकारात लक्ष घातले म्हणून आज तुमच्यासमोर मार्गदर्शन करायला उभा आहे.

तसेच ज्यावेळेस कोकण रेल्वे होत होती तेव्हा तिला पैसे हवे होते. मुंबई बँकेने १५० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले. सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांनाही पैसे दिलेत. त्या संस्थांच्या माध्यमातून त्या तालुक्याचा विकास होताना दिसत आहे.

दरेकर पुढे म्हणाले कि, मुंबईत मी स्वयं पुनर्विकास योजना सुरू केली. त्यानंतर गृहनिर्माण संस्था अर्ज करायला लागले. आज आमच्याकडे जवळपास १६०० प्रस्ताव आलेत. ४० संस्थांना आम्ही कोट्यावधीचे कर्ज दिले आहे. त्यातील १५ इमारती उभ्या राहिल्या असून त्यामध्ये रहिवासी राहण्यासही गेले आहेत. यासाठी शासनाच्या ज्या परवानग्या लागतात त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी योजना आणली. गृहनिर्माण परिषदेत २० मागण्या आम्ही केल्या होत्या. त्यापैकी १८ मागण्यांचे शासन निर्णय काढण्यात आले. मुख्यमंत्री स्वतः स्वयं पुनर्विकासासाठी आग्रही आहेत. केवळ स्वयं पुनर्विकास नाही तर क्लस्टर पुनर्विकास करा. त्यासाठी त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली शासनाची दरेकर समिती नेमल्याचेही दरेकरांनी म्हटले.

लाडक्या बहिणींबाबत बोलताना दरेकर म्हणाले कि, लाडक्या बहिणींना १५०० रूपये सरकार देत आहे. मुंबई बँकेत लाडक्या बहिणींची ६०-७० हजार खाती आहेत. लाडक्या बहिणींकडून एकही रुपया न भरता खाती उघडून घेतली. आता त्यांना १५०० वरुन पंधरा हजार कसे करायचे यासाठी प्रयत्नशील असून १ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. येणाऱ्या महिन्याभरात ज्या महिलांना शिलाई मशीन दिली आहे त्यांना २५ हजाराचा चेक देणार आहोत, असेही दरेकर म्हणाले.

आपल्या कोकणाचा, तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी रचनात्मक काम करायला हवे. हे रचनात्मक काम सहकारतूनच होते. महाड-पोलादपूर येथील महिलांचे शिबीर घ्या, सहकाराच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देऊ. ही चळवळ गतीने गावागावात कशी पोचेल याची काळजी घ्या. ‘सहकारातून समृद्धी’ हे केंद्रीय सहकार मंत्र्यांचे घोषवाक्य आहे. सहकारातून समृद्धी कोकणात आली पाहिजे. यासाठी नव्या पीढिने कामाला लागावे, असे आवाहनही दरेकर यांनी केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here