*शक्तीपीठ महामार्ग ग्रस्त शेतकऱ्यांच्या खंबीरपणे उभे राहणार *
*विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही*
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा आज धडक मोर्चा
मुंबईत आझाद मैदान वर मोर्चा


या मोर्चाला काँग्रेस विधिमंडळ विधान सभानेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, विश्वाजीत कदम, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी उपस्थित
मुंबई – शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज उपस्थित राहून त्यांनी संबोधित केले.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुर येथील सभेत सदरील शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्य सरकार हा महामार्ग करणार नसल्याचा आश्वासन दिलेला व्हिडीओ यावेळी दानवे यांनी दाखवला. यापूर्वीच राज्यातील देवस्थानांना जोडण्यासाठी चांगले रस्ते असताना शक्तीपीठ महामार्गाची काय आवश्यकता,असा प्रश्न अंबादास दानवे यांनी राज्य सरकार विचारला..
राज्य सरकार कंत्राटदाराच्या फायद्यांसाठी हा शक्तिपीठ महामार्ग करत असून शेतकरी हिताशी शासनाला काही देणे घेणे नाही, अशी टीका दानवे यांनी केली.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आणि आता महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग करत असेल तर शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे असल्याचा ठाम विश्वास अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच, सदरील प्रकरणी विधान परिषद सभागृहात विरोधीपक्षांच्या वतीने स्थगन प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली..
याप्रसंगी आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, कैलास पाटील, सचिन अहिर, प्रवीण स्वामी, राजू नवघरे, राजू शेट्टी व दिलीप सोपल उपस्थित होते.






















