मराठी मालक पत्रकार म्हणून कधीही काम बंद करतो!केलेल्या कामाचा मोबदलाही मिळत नाही.
*माफी असावी* मराठी मराठी करतो आपण
एक सामाजिक कार्यकर्ती पत्रकार म्हणून
पत्रकारा साठी जीव धोक्यात घालून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले
मैदानाच्या बाजूला असलेल्या मराठी पत्रकार संघाने दुर्लक्ष केले म़त्रालय वार्ताहर संघही तसाच!
कसे हे पत्रकार? त्यांना वाटलं काहीच होणार नाही या बाई कडून… मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ मंत्री मंडळात मंजूर करून घोषित केले!
आणि आता अनेकजण त्याच महामंडळाचे अध्यक्ष होण्यासाठी सेटिंग लावताहेत . महामंडळाच्या मुळ संकल्पनेपासून स्वरूप मांडणी करणारी मी बाजूला टाकली जाते!.ही आमची माझी लाडकी बहिण योजना!
इथे गुणवत्ता आणि बुद्धीमत्ता याला काही किंमत नसते!इथेही राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण ,जातीपातीचा कट करणार!एक बाई काम करतेय।।
ती मंत्रालयात येउ नये म्हणून आमच्या दैनिकाचे मालक संपादक गोसावी साहेबांना समुहाने भेटून मी कशी वाईट आहे भांडखोर आहे हे सांगायला गेले! हिला अधिस्वीकृती देउ नका म्हणाले.
आमच्या गोसावी साहेबांनी माझ्या भावाने त्यांना झिडकारले!
मा वीणाताई आईसारख्या माझ्या मदतीला धावल्या. तेव्हा मला माझे अधिकार मिळाले.
*माझ्या नवऱ्याची हत्या झाली*
दि १४ फेब्रुवारी२०२५ला केईएम हॉस्पिटलमध्ये पहाटे ४वाजता उपचाराअभावी माझा नवरा हरीष रामचंद्र करदेकर (८तास तडफडून) हे जग सोडून गेला. त्याची हत्या झाली.
कोण किती जण मराठी म्हणून बोलले , कोण भाऊ पुढे आला बहिणीच्या मदतीला?
अनेक पत्रकार दिल्लीत मिरवायला गेले. बाईला दुर्लक्षाने.मारण्याचा हा क्रूरपणा!
दादरला आमच्या खांडके बिल्डिंग ११ व १२ वर बाजूच्या एस आर ए विकासक विलास खर्चेने आक्रमण केले.भूमापन अधिक्षक मोजणीच्या अहवालात तफावत असल्याचे नमूद करतात! मग कामाला मंजुरी मिळते कशी? हा प्रश्न पत्रकार बहिणीने विचारायचा नाही! कारण कुंपणच शेत खातय!
सेनाभवन,शीवतीर्थाजवळ मराठी माणसांची जागा लाटली जातेय आमदार खासदार इतर सगळे …चोर आमची भिंत तोडून जागा खाणाऱ्या चे रक्षक बनलेत!
यात सगळे.पक्ष माती खात आहेत
नगरविकास व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे नी नगरविकास अधिकाऱ्यांना ‘काम करा ताईंच’ सांगितले …पण ते.झाले नाही
ताई नि मराठी पण इथे गाडले गेलेत.
तिकडे संजय निरुपम मुस्लिम जिहाद म्हणून कोकलतात
इथे.सेनाभवन , शिवतीर्थाजवळ
आमची मराठी माणसाची जागा खाल्ली जाते!
सगळेच मराठी…
कोणता चँनल उभा राहिला आमच्या साठी?
विषय खूप आहेत
वेदना छळ.अनुभव.अनेक आहेत
कसला मराठी माणूस?
गुणवत्तेवर काम करणाऱ्या वर.चिखलफेक करणारा!
बाईला तर जास्त त्रास!
आजची ही सावित्री त्याच वेदना तोच छळ भोगतेय!
जशी प्रजा तसाच राजा!
दलालांनी घेरलय! आणि सरकार चेहरे स्कँनिंग करतेय!
सगळाच खेळ! कशाला नाही मेळ!
फक्त नि फक्त अन्याय तोही जगणं उध्वस्त करणारा!
🙏😔
शीतल हरीष करदेकर






















