Home उद्योग / शिक्षण वार्ता जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत असतानाच लाखो बेरोजगार युवक आणि युवतींना रोजगार देणं...

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत असतानाच लाखो बेरोजगार युवक आणि युवतींना रोजगार देणं याच उद्देशानं आज हे एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत-ना.उदय सामंत

113
0

DAVOS | दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात आली 6 लाख कोटींची गुंतवणूक- उदय सामंत

– आज दावोसला येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचा दुसरा दिवस आहे आणि आज देखील कालच्यासारखीच गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे
– मी आपल्या सगळ्यांना आठवण करुन देतो की गेली दोन वर्ष राज्याचा उद्योगमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मी याठिकाणी आलो होतो
– हे करत असताना पहिल्या वर्षी आम्ही १ लाख ३७ हजार कोटी, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दावोसमध्ये येऊन ३ लाख ७० हजार कोटी आणि मुंबईला गेल्यानंतर २ लाख कोटी असे ५ लाख ७० हजार कोटींचे एमओयू करण्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यामधून ८३ टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी आपण करतोय
– ही अंमलबजावणी करताना त्यांना जमीनी, पॅकेज दिलेले आहेत, हा तीन ते चार वर्षाचा काळ असल्यामुळं येत्या दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षाच्या एमओयूची परिपूर्तता होईल आणि प्रकल्प उभे राहतील
– त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली
– कालच्या या सहा लाखाच्या एमओयूमध्ये डिफेन्सचे एमओयू आहेत, सिडको सारख्या संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चरचे एमओयू आहेत, काही संस्थांशी केलेले टेक्निकली आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होण्यासाठी केलेले एमओयू आहे, Data centreमध्ये केलेले एमओयू आहेत
– असे विविध प्रकारचे सेक्टरमध्ये काल आम्ही सहा लाख कोटींचे एमओयू केले आणि ही परकीय गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे
– आज देखील अनेक उद्योजकांशीदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत
– अनेक उद्योजकांनी याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उद्योग करण्याचा निर्णय आणि उद्योजक म्हणून महाराष्ट्रामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे
– आजदेखील अनेक कंपन्यांशी आम्ही एमओयू करणार आहोत
– मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये जाऊन देखील स्वतःचं भाषण त्याठिकाणी करणार आहेत आणि महाराष्ट्राचं नक्की उद्योगाच्या बाबत धोरण काय आहे हे देखील त्याठिकाणी सांगतील
– गेली दोन वर्ष याच ठिकाणी एकनाथ शिंदेंनी देखील महाराष्ट्राची भूमिका मांडली होती
– आम्ही इथल्या उद्योजकाला येणाऱ्या गुंतवणुकीच्या निमित्ताने येणारी जी लोकं आहेत त्यांना सांगतोय की मैत्रीसारखा एक अतिशय महत्वाचा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलाय आणि तो कायदा अपडेट करण्याच्या दृष्टीनं आम्ही पाऊलं टाकली आहेत
– आम्ही पोर्टल येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर लॉंच करतोय आणि ते पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीतकमी वेळामध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे
– उद्योजकांची जी कायमस्वरूपी एक तक्रार असते की आम्ही अर्ज केल्यानंतर आम्ही अॅप्लीकेशन केल्यानंतर आमची फाईल कुठे आहे? कुठच्या अधिकाऱ्याकडे आहे? कुठच्या कक्ष अधिकाऱ्याकडे आहे? किती दिवस आहे? हे आम्हाला कळत नाही
– तर देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे की अॅप्लीकेशन कसं करायचं? आणि अॅप्लीकेशन केल्यानंतर ते अॅप्लीकेशन नक्की कुठं आहे? हे दाखवणार पोर्टल पुढच्या आठ दिवसामध्ये कॅबीनेटच्या निमित्त आम्ही हाराष्ट्रामध्ये आणतोय त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे
– मला एवढंच सांगायचं आहे की हा जो दौरा आहे, हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा दौरा आहे आणि तो महत्वाचा दौरा असताना उद्योजकांना आकर्षित करणं, त्यांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि FDI महाराष्ट्रामध्ये आणणं हे धोरण घेऊनच आम्ही आलो आहोत
– मला सांगताना आनंद की आम्हाला फार मोठं याच्यामध्ये यश आलेलं आहे
– काल देखील मोठे उद्योजक मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी देखील विश्वास दिला आहे की महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही आणतो आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं आश्वासन काल देखील अनेक उद्योजकांनी दिलेलं आहे, आज देखील मला असं वाटतं की क्षेत्रातले ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो लक्ष्मण मित्तल, Tataचे चंद्रशेखरन मुख्यमंत्र्यां भेटले आहेत
– त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की उद्योजकांना विश्वास देणं आणि उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा प्राधान्यक्रम घेऊनच हे दौरे आयोजित केले आहेत – आजच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्या माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की जे होत आहे आणि ते झाल्यानंतर आमच्यातले काही हितचिंतक याची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष ठेऊन असतात त्याचं उत्तर म्हणजे मागील दोन वर्षांमध्ये झालेले जे एमओयू होते त्यामधले ८३ टक्के आम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवतोय
– आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करतोय आणि अनेक उद्योजकांनी सांगितलं काल जर आपण बघितलं असेल की कालचा सगळ्यात मोठा जो मास्टर स्ट्रोक होता तो JSW नं तीन लाख कोटींचा एमओयू आपल्याबरोबर केलाय आणि विविध भागांमध्ये केला आहे, आधीच विदर्भ, मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये त्यांचे प्रकल्प सुरु आहेत
– तीन लाख कोटीचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणताना त्यांनी भावना व्यक्त केली की महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य असू शकत नाही की ज्या ठिकाणी उद्योजकांनी यावं आणि गुंतवणूक करावं महाराष्ट्र हे उद्योजकांचं समर्थन करणारी भूमी आहे अशा पद्धतीचे गौरव उद्गार सज्जन जिंदाल ज्यांनी तीन लाख कोटी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी देखील घेतलेला आहे
– Data center फार मोठी गुंतवणूक होते त्याच्यावर मला असं वाटतं की आज झालेल्या हा नक्की आमचा दौरा यशस्वी होईल आणि ज्या काही गोष्टी केल्या जात होत्या किती होतील? किती उद्योजक महाराष्ट्रामध्ये येतील? उद्योजक नक्की किती गुंतवणूक करतील? त्यांची परकीय गुंतवणूक आहे की नाही? याबद्दल शंका निर्माण केली गेली आणि उद्यापासून अजून केली जाईल
– मी परवा देखील सांगितलं की महाराष्ट्रातला जरी उद्योजक असेल महाराष्ट्रात त्यांनी जरी परकीय गुंतवणूक आणली तर ती आपण परकीय गुंतवणूक मध्येच कॅलक्युलेट करतो त्याच्यामुळे FDI मार्फतच हे प्रकल्प पुढे नेले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये फार मोठी गुंतवणूक आज महाराष्ट्रासारख्या राज्याला मिळते
– काल देशाचे विमान मंत्री देखील विमान वाहतूक मंत्री देखील आले होते, महाराष्ट्रातील अनेक विमानतळांची कामं पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे
– रत्नागिरीचे विमानतळ असेल किंवा सिंधुदुर्गचे विमानतळ असेल हे देखील कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सुरू ठेवता येतील कशा पद्धतीनं विकास करता येतील या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली
– महाराष्ट्र हा जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ असलेला एक राज्य आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे विमानतळ आहे आणि त्या विमानतळाचं अपग्रेडेशन करणं हे देखील महाराष्ट्र भूमिका आहे आणि त्यासाठी देखील केंद्र सरकार हे महाराष्ट्राच्या सोबत राहील अशा पद्धतीचं आश्वासन कालच विमान उड्डाण मंत्र्यांनी आपल्या येऊन केलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपला हा जो दावोसचा प्रवास आहे ज्याच्यासाठी आम्ही याठिकाणी आलोय तो यशस्वीतेकडे वाटचाल करतो यशस्वी होतोय आणि आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की ज्या पद्धतीनं आमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याने देखील यासाठी मेहनत घेतले ती खरोखरच एवढे आम्ही करू शकतोय
– दोन वर्षापूर्वी सुरू झालेली ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालची परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्षीही पुढे जाते याबद्दल मला मनापासूनचा उद्योगमंत्री म्हणून समाधान आहे आणि मनापासूनचा या दोघांबद्दल आदर देखील आहे
– महाराष्ट्राच्या जनतेला मला एवढंच म्हणून सांगायचं आहे की जे आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला कामानं उत्तर देण्याचं काम हे सरकारनं पुन्हा एकदा केलं आहे
– एवढंच मला या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायचा होता
– पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून आमच्यावर प्रेम केलं,आम्हाला फार मोठं बहुमत दिलं
– आमचे दोनशे सदतीस आमदार हे विधानसभेमध्ये पाठवले त्याच्यामुळं आमची देखील जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्याला चांगल्या पद्धतीनं पुढं नेणं, त्या विश्वासाला पात्र ठरत असतानाच लाखो बेरोजगार युवक आणि युवतींना रोजगार देणं याच उद्देशानं आज हे एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे
– असेच महाराष्ट्राच्या जनतेचं सहकार्य हे महायुतीच्या सरकारबरोबर राहू दे एवढीच या माध्यमातून मी विनंती करतो आपण जसं भरभरून आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दिला तसाच विश्वास महायुतीच्या सरकारवर आपण ठेवावा तुमच्या विश्वासाला आम्ही नक्की पात्र ठरू हा विश्वास तुम्हाला याठिकाणी देतो

BYTE- उदय सामंत, उद्योग मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here