*ही निवडणूक उद्धव ठाकरे किंवा मला मंत्री बनायला नाही तर महाराष्ट्राच्या अस्तिवासाठी लढतोय*
*आमचं हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि हृदयात राम*
*मला निवडून द्या, मी मंत्री होणार आहे म्हणणाऱ्या इथल्या उमेदवार आता आमदारही होणार नाहीत*
*भायखळा विधानसभेचे मविआ उमेदवार मनोज जामसुदकर ह्यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा संपन्न*
१० नोव्हेंबर २०२४, भायखळा*
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची आज भायखळा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोज जामसुदकर ह्यांच्या प्रचारार्थ भायखळा येथे सभा पार पडली . यावेळी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस इतर सर्वांनी इथं जास्त मेहनत घेतली . आता पुन्हा एकदा हीच ताकद आपल्याला दाखवायची आहे . असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं .
तसेच बोलताना आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की ‘एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली आणि मुख्यमंत्री झाले, त्याच्या सोबत आणखी 40 जणांनी गद्दारी केली, तेव्हा त्यांच्या सोबत इथं असलेल्या आमदार देखील होत्या . त्या आता सांगतायत की मला निवडून द्या, मी आता मंत्री होणार आहे . पण त्या मंत्री तर होणं सोडा आमदारही होणार नाहीत . आणि एक लक्षात ठेवा त्यांचं सरकार पुन्हा येणारच नही . उलट ज्यांनी ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फच्या लादीवर शिक्षा देऊ आणि जेलमध्ये पाठवू’ असा इशारा त्यांनी दिला .

*आमचं हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि हृदयात राम*
उपस्थित कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘गेल्या 10 वर्षात एकाच व्यक्तीची मन की बात ऐकली, आता आपल्याला दिल की बात करायची आहे . इथे तरुणांना जॉब नाहीत त्यांचे जॉब हे एकनाथ शिंदेने हिरावून घेतले आहेत . योगी येतात आणि म्हणतात बटोगे तो कटोगे, पण मी तुम्हाला सांगतोय भाजप आपले खिसे कापायला तयार आहे . मी आताही इथं सांगतोय आमच हिंदुत्व अजूनही आहे . आमचं हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि हृदयात राम . त्यामुळे आमचं सरकार येणार आहे तेव्हा एकच ध्येय असणार ते म्हणजे जॉब देणं’. असं आदित्य ठाकरे म्हणाले
*ही निवडणूक उद्धव ठाकरे किंवा मला मंत्री बनायला नाही तर महाराष्ट्राच्या अस्तिवासाठी लढतोय*
विधानसभा निवडणूक अत्यात महत्त्वाची असल्याचं म्हणत भाजप आलं तर आपला खिसा कापायचं काम करेल . इथले प्रकल्प गुजरातला घेऊन गेलेत . जर पुन्हा राज्यात भाजपचं सरकार आलं तर आपल्याला मुंबईत फिरायला देखील अदानीची परवानगी घ्यावी लागेल . त्यामुळे ही निवडणूक उध्वजींना मुख्यमंत्री बनवायला किंवा मला मंत्री बनायला किंवा आमदार खासदार बनायला कोणी लढत नाही, तर ही निवडणूक आपण महाराष्ट्राच्या अस्तिवासाठी लढतोय’. असं आदित्य ठाकरे म्हणाले .



















