विक्रोळी आगारातील बेस्ट मधील बस वाहक अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक ७ मध्ये कार्यरत असताना काल दिनांक १९/०९/२४रोजी धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला आहे.त्यांना सद्या सायन रुग्णालयात अती दक्षता विभागात मध्ये दाखल करण्यात आले आहे.
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आज सदर कर्मचारी वर्गास सायन रुग्णालयात भेट दिली असून ह्या हल्याचा त्यांनी जाहीर निषेध केला असून,सरकारचे कोणत्याच गोष्टींवर नियंत्रण नसून सरकारच्या गृह विभागाच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री,आणि उपमुख्यमंत्री यांचे महाराष्ट्राच्या जनतेवर लक्ष नसून फक्त निवडणुका कश्या पद्धतीने जिंकायच्या आहेत याकडेच त्यांचे लक्ष जास्त आहे.अशा शब्दात सुहास सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.*
तसेच बेस्ट मध्ये गेल्या तीन वर्षापासून समिती नसल्याने बेस्ट वर प्रशासक असून त्यांना जाब विचारण्यासाठी कोणीही नसल्याने बेस्ट मध्ये अधिकारी वर्गाचा सावळा गोंधळ चालू आहे .

बेस्ट मध्ये असे प्रकार आता वारंवार घडत आहेत,याला सर्वस्वी जबाबदार बेस्ट प्रशासन असून,त्यात बेस्टचे खाजगीकरण,बेस्ट मध्ये निवृत कामगार अधिकारी यांना परत कामावर घेणे,यामुळे बेस्टची शिस्त बिघडली आहे.
सदर सर्व प्रकरणात मीडिया असोशियन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी देखील सहकार्य केले त्याबद्दल बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत साहेब यांनी त्यांचे आभार मानले
















