महविकास आघाडी पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न
महाराष्ट्राची एकजूट महायुतीला पराभूत करू शकते -आदित्य ठाकरे
मुंबई
विधानसभा २०२४ निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन आज मुंबईच्या माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्याला महाविकस आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती . शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मां. आमदार आदित्यजी ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मेळाव्यातून मार्गदर्शन केलं . यावेळी ‘महाराष्ट्राची एकजूट महायुतीला पराभूत करू शकते’, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला .
दरम्यान पुढच्या काळात आपल्यात भांडणं लावण्याची कामं होतील, पण आपण वेगळे होऊन चालणार नाही . हे वातावरण महाविकास आघाडिच वातावरण आहे . हीच ताकत विधानसभेत दिसून आली पाहिजे . महाविकास आघाडी म्हणून आपण लोकसभा जिंकून दाखवली आहे . कमळ चिखलात उगवतं , पण आपण चिखलात अडकणार आहोत का ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करतानाच एकजूट दाखवण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला .
आज भाजपचं पूर्ण बहुमताच सरकार असतं तर त्यांनी स्वतःच संविधान लादलं असतं
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘जी भाजप 400 पारचा नारा देत होती त्यांला देशाने खाली खेचलं आहे . आज जर भाजपचं सरकार असतं तर त्यांनी स्वतःच संविधान लादलं असतं . आणि ते फेक नरेटिव्ह न्हवतं, हे करण संविधान बदलण्याची प्रक्रिया महाराष्ट्रमधून सुरू केली होती . पण हे जनतेपर्यंत आपण पोहचवल . असं आदित्य ठाकरे म्हणाले .
महविकास आघाडीच सरकार पाडलं, कोण वेश बदलून जात होतं . मग सुरत, गुवाहाटी सगळं पाहिले . सरकार पाडलं, पक्ष चोरला . दोन्ही पक्षांचं तसं केलं . हे घटनाबाह्य नाही तर काय आहे ? लोकशाही चिराडण्याचा हा प्रयत्न आहे . होर्डिंग वर जशी कामं दिसत असतील ती खरी झाली असती तर बर झालं असतं . पण केवळ दिखवेपणा सुरू आहे . अशी टीका आदित्य ठाकरेंनी मिंदे सरकारवर केली .
मिंदे सरकार महाराष्ट्रात जितके लुटू शकतात तितका पैसा लुटताहेत
मिंदे सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र आणि मुंबईची लूट झाली आहे . मिंदे सरकार महाराष्ट्रात जितके लुटू शकतात तितका पैसा लुटताहेत . 40 चोरांना खोके आणि नोकऱ्या मिळाल्या पण तरुण बेरोजगार आहे . आपला तरुण जाणार तरी कुठे एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आल्या आहेत ? माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडका राज्य ही योजना रबवली आहे . पोलीस भरतीसाठी 18 लाख तरुण मुंबईत आले . पण नोकऱ्या कुठे आहेत ? जे पोलीस आहेत त्यांना अनेक घरांच्या योजना महाविकास आघाडीने केल्या होत्या . पण हे सरकार सगळं गुजरातला घालवतय . आता भीती आहे की जर यांचं सरकार आलं तर मंत्रालय पण गुजरातला नेतील . अशी भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली .






















