Home Uncategorized *दुःखाच्या सावटातही आशेचा किरण; धुमाळ कुटुंबीयांच्या पाठीशी मायेचा आधार — मंत्री उदय...

*दुःखाच्या सावटातही आशेचा किरण; धुमाळ कुटुंबीयांच्या पाठीशी मायेचा आधार — मंत्री उदय सामंत*

6
0

*दुःखाच्या सावटातही आशेचा किरण; धुमाळ कुटुंबीयांच्या पाठीशी मायेचा आधार — मंत्री उदय सामंत*

*नांदेड, ता. सायाळ, दि. ८ —*

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी नांदेड जिल्ह्यातील सायाळ गावात आज ग्रामस्थांसोबत दिवाळीचा फराळ केला आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. यावेळी त्यांनी गावातील मुक्ताबाई केशव धुमाळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्यासोबतही दिवाळीचा फराळ केला.

मुक्ताबाईंच्या पतीचं निधन झालं असून, पाच मुलींच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी मोठ्या जिद्दीनं सांभाळली आहे. दोन मुलींची लग्नं झाली असून, उर्वरित तीन मुली सध्या शिक्षण घेत आहेत. कुटुंबाचा आधार हरपल्यानंतरही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या मुक्ताबाईंचा संघर्ष मनाला स्पर्शून गेला.

या तिन्ही मुलींचं शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, त्यांच्या स्वप्नांना आर्थिक परिस्थितीची मर्यादा पडू नये, यासाठी शिक्षणाच्या बाबतीत काहीही कमी पडू दिलं जाणार नाही, असा शब्द मंत्री उदय सामंत ह्यांनी धुमाळ कुटुंबीयांना दिला.

तसेच मुक्ताबाईंना उदरनिर्वाहासाठी आवश्यक मदत कशा प्रकारे करता येईल, यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल, असंही त्यांनी आश्वस्त केलं.

पतीच्या निधनाचं दुःख मनात साठवून मुलींचं भविष्य घडवण्यासाठी झटणाऱ्या एका माऊलीच्या पाठीशी उभं राहणं, ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर माणुसकीचं कर्तव्य आहे. दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे उजळण्यात नाही, तर संघर्ष करणाऱ्या एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करण्यात आहे.

मुक्ताबाईंच्या जिद्दीला बळ मिळो, त्यांच्या मुलींची स्वप्नं पूर्ण होवोत आणि धुमाळ कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा सुख-समाधानाची पहाट उजाडो, हीच मनापासून सदिच्छा, असे मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

*#Sayal #DhumalKutumb #MuktabaiDhumal #UdaySamant #Nanded #DiwaliFaral #EknathShinde #ShivSena*

—
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here