Home मुंबई *गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाला वेग -दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला गती* — *‘तुळशी’कडून २७०...

*गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाला वेग -दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला गती* — *‘तुळशी’कडून २७० मीटर पूर्ण, ‘विहार’कडून दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास ७ नोव्हेंबरपासून प्रारंभ*

6
0

*गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाला वेग -दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला गती* — *‘तुळशी’कडून २७० मीटर पूर्ण, ‘विहार’कडून दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास ७ नोव्हेंबरपासून प्रारंभ*

*मुंबई, ८ नोव्हेंबर —*

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूककोंडी कमी करून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे.

या दुहेरी बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘तुळशी’ या बोगदा खनन यंत्राद्वारे (TBM) आतापर्यंत २७० मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या ‘विहार’ या दुसऱ्या बोगदा खनन यंत्राद्वारे शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष खोदकामास प्रारंभ करण्यात आला आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किमी लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान SGNP खाली अत्याधुनिक TBM तंत्रज्ञानाद्वारे ५.३४ किमी लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत.

पहिल्या बोगदा खणन संयंत्राचे नामकरण ‘तुळशी’ आणि दुसऱ्याचे ‘विहार’ असे करण्यात आले आहे. तांत्रिक प्रक्रिया व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘तुळशी’ कार्यान्वित करण्यात आले. सध्या खोदकामाची सरासरी गती प्रतिदिन ६ मीटर असून टप्प्याटप्प्याने १० मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

‘विहार’ या दुसऱ्या संयंत्राची Site Acceptance Test नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक व नियंत्रण प्रणालींची तपासणी करण्यात आली. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ‘विहार’ला प्रत्यक्ष खनन कार्यासाठी सज्ज घोषित करण्यात आले आणि ७ नोव्हेंबर २०२६ पासून दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास प्रारंभ झाला.

‘विहार’ हे Single Shield Earth Pressure Balance (EPB) तंत्रज्ञानावर आधारित आहे. कटर हेडचा व्यास १४.४९ मीटर, संपूर्ण संयंत्राची लांबी ८३ मीटर — २२ मीटर शिल्ड + ६१ मीटर बॅकअप गॅन्ट्री.

प्रत्येक भूमिगत बोगद्याची एकूण लांबी ६,६७५ मीटर आहे — त्यापैकी ५,३४० मीटर TBM द्वारे, उर्वरित १,३३५ मीटर बॉक्स बोगदा, रॅम्प व शाफ्ट. अंतर्गत व्यास १३ मीटर, प्रत्येक बोगद्यात ३+३ अशा एकूण सहा मार्गिका. दोन्ही TBM गोरेगावहून खोदकाम करत मुलुंड पश्चिम अमर नगर येथे बाहेर पडणार आहेत. *संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.*

मुलुंड येथील रिट्रिव्हल शाफ्ट व रॅम्पसाठी एकूण ७४३ बांधकामे बाधित होत होती — त्यापैकी ६१२ निष्कासित, उर्वरित १३१ डिसेंबर २०२६ अखेर किंवा जानेवारी २०२७ सुरुवातीस निष्कासित करण्याचे नियोजन. बाधित कुटुंबांचे कांजूरमार्ग येथे पुनर्वसन — इमारती अंतिम टप्प्यात.

*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर* म्हणाले, “पहिल्या बोगद्याच्या ‘तुळशी’ सोबतच ‘विहार’द्वारे दुसऱ्या बोगद्याचे खोदकामही सुरू झाल्याने दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीला समांतर गती मिळणार आहे. नियोजित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती साधता येणार आहे. खोदकामात विलंब होऊ नये यासाठी उपाययोजना राबवाव्यात, मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी वेळेत उपलब्ध करावेत.”

बोगदा खनन तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्याने कामगार व अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, सुरक्षा मानकांचे पालन, मलबा वाहतूक व विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*#GMLR #GoregaonMulundLinkRoad #Tulshi #Vihar #TBM #BMC #SGNP #MumbaiInfrastructure #AbhijitBangar*

—
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here