Home मनोरंजन रंगकर्मींना पोषक वातावरण आणि योग्य संधी मिळाल्यास रंगभूमी अधिक समृद्ध होईल —...

रंगकर्मींना पोषक वातावरण आणि योग्य संधी मिळाल्यास रंगभूमी अधिक समृद्ध होईल — नीलम शिर्के-सामंत

5
0

²_रंगकर्मींना पोषक वातावरण आणि योग्य संधी मिळाल्यास रंगभूमी अधिक समृद्ध होईल — नीलम शिर्के-सामंत_

*नाशिक, दि. ७ -*

नाशिक महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखा आयोजित ११व्या रंगभूमी पुरस्कार वितरण सोहळ्यास अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी उपस्थित राहून पुरस्कारार्थींचा गौरव केला.

यावेळी नाट्य परिषदेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मराठी रंगभूमीचा विकास आणि नाट्य चळवळ बळकट करण्यासाठी रंगकर्मींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. रंगकर्मींना पोषक वातावरण आणि योग्य संधी मिळाल्यास रंगभूमी निश्चितच अधिकफ समृद्ध होईल, असे सांगून पुरस्कारप्राप्त कलावंतांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अ. भा. मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे प्रवीण कमळे, रवींद्र कदम, सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, लक्ष्मण सावजी व पदाधिकारी उपस्थित होते.

*#MarathiRangbhumiDin #Nashik #NeelamShirkeSamant #MarathiTheatre #RangbhumiAwards*

—
*संपादक:* प्रो. शीतल करदेकर / माईमीडिया२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here