Home महाराष्ट्र शिवसेनेची दिवाळी यंदा शेतकऱ्यांसोबत बांधावर; मंत्री आणि पदाधिकारी दुष्काळग्रस्त भागात साजरी करणार...

शिवसेनेची दिवाळी यंदा शेतकऱ्यांसोबत बांधावर; मंत्री आणि पदाधिकारी दुष्काळग्रस्त भागात साजरी करणार दिवाळी-ना. उदय सामंत

5
0

*शिवसेनेची दिवाळी यंदा शेतकऱ्यांसोबत बांधावर; मंत्री आणि पदाधिकारी दुष्काळग्रस्त भागात साजरी करणार दिवाळी_*

*जालना/मुंबई, दि. ७ -*

शिवसेनेची दिवाळी यंदा शेतकऱ्यांसोबत बांधावर साजरी होणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी बांधव आणि त्यांची कुटुंबे संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या दुःखात सहभागी होणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत साजरी करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे.

केवळ मदत देऊन जबाबदारी संपत नाही, तर संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना मानसिक आधार देणे तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावनेतून शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकारी राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांमध्ये जाऊन शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ करणार आहेत.

*मंत्र्यांचे दौरे:*
– *एकनाथ शिंदे -* जालना जिल्हा (मौजपुरी, जालना)
– *गुलाबराव पाटील -* पोखरी तांडा, जळगाव
– *प्रताप सरनाईक -* पानखंडा, धाराशिव
– *दादा भुसे -* मालेगाव
– *संजय शिरसाट -* शिंदोण तांडा, छत्रपती संभाजीनगर
– *शंभूराज देसाई -* खटाव, सातारा
– *प्रकाश आबिटकर -* आटपाडी/उंबरगाव, सांगली
– *भरत गोगावले -* भोर, पुणे
– *संजय राठोड -* मंगरूळ, यवतमाळ
– *योगेश कदम -* पालघर
– *आशिष जयस्वाल -* कोलिथमारा, नागपूर
– *(स्वतः नांदेड जिल्ह्यातील सायाळ येथे)*

शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ७ ते ७.५ लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत शिधावाटप पोहोचवण्यात आले असून आणखी ४ ते ५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणीटंचाई सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टरला जोडता येणारे २ ते २.५ हजार लिटर क्षमतेचे टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही दिवाळी केवळ एक दिवसाचा दौरा किंवा औपचारिक भेट नाही. दिवाळी संपली म्हणून जबाबदारी संपणार नाही. शासनाच्या माध्यमातून मदतकार्य सुरूच राहील.

“दरवर्षी आपण कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो; पण यंदा शेतकरी हेच आमचे कुटुंब आहे. त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्यासोबत फराळ करून त्यांच्या मनाला आधार देणे, हीच यंदाच्या दिवाळीची खरी भावना आहे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

—
*संपादक:* प्रो. शीतल करदेकर / माईमीडिया२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here