> *ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत ५५७ कुटुंबांचे स्वप्न साकार — घर वाटप — सचिन अहिरांच्या पाठपुराव्याला यश*
*📰 पूर्ण बातमी:*
*बीडीडी चाळ पुनर्विकास — ५५७ रहिवाशांना दिवाळीत हक्काचे घर*
मुंबई, ५ नोव्हेंबर — ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचा वितरण सोहळा उद्या शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून दिवाळीच्या मुहूर्तावर रहिवाशांना हक्काचे घर मिळणार आहे.
म्हाडातर्फे आयोजित या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
*सोहळा तपशील:*
दिनांक — शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६
वेळ — दुपारी १२:०० वाजता
स्थळ — यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई
—
*



















