Home मुंबई *मुंबईत विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम — ७७९ टन राडारोडा...

*मुंबईत विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम — ७७९ टन राडारोडा आणि ३६८ टन धूळ संकलित — ९६६ मनुष्यबळ, ८८ यंत्रे तैनात*

6
0

> *मुंबईत विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम — ७७९ टन राडारोडा आणि ३६८ टन धूळ संकलित — ९६६ मनुष्यबळ, ८८ यंत्रे तैनात*

*वायू गुणवत्ता राखण्यासाठी BMC ची विशेष मोहीम*

मुंबई, ५ नोव्हेंबर — मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी आणि रस्त्यांवरील धूळ व बांधकाम राडारोड्यामुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम राबवली जात आहे.

आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू आहे.

या मोहिमेंतर्गत आतापर्यंत *७७९.५५ टन बांधकाम राडारोडा (C&D Waste) आणि ३६८.९१ टन धूळ* संकलित करण्यात आली आहे.

*१४६ रस्त्यांवर स्वच्छता — प्रमुख मार्ग:*
बीकेसी कनेक्टर, एससीएलआर, पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग, जेव्हीएलआर, घाटकोपर-मानखुर्द मार्ग, एस. व्ही. रोड, लिंक रोड, कार्टर रोड, शीव-मानखुर्द मार्गासह २६ वॉर्डांमधील धूळप्रवण रस्ते.

*काय केले जात आहे?*
सखोल झाडलोट, स्क्रॅपिंग, कडेची धूळ-गाळ हटवणे, दुभाजक-पदपथ स्वच्छता, मिस्टिंग व पाण्याची फवारणी, कचऱ्याची तातडीने उचल.

*मनुष्यबळ व यंत्रणा:*
९६६ कर्मचारी + ८८ यंत्रे — १६ जेसीबी, १९ डंपर, १९ मिस्टिंग मशीन, २२ पॉवर स्वीपर, ५ ई-स्वीपर, ७ दुभाजक स्वच्छता यंत्रे.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here