*अखेर ७ वर्षांनंतर तिवरे-भेंदवाडीतील ३३ कुटुंबांना हक्काचं घर;* *पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण!*
रत्नागिरी | १२ सप्टेंबर २०२६
२ जुलै २०१९ – रत्नागिरीकर कधीच विसरू शकणार नाहीत तो काळा दिवस. अतिवृष्टीमुळे तिवरे धरण फुटलं आणि भेंदवाडीतील संसार उद्ध्वस्त झाले.
आज ७ वर्षांनंतर त्या जखमेवर फुंकर घालणारा दिवस उजाडला!
*३३ कुटुंबांना हक्काचं, पक्कं आणि सन्मानाचं घर!*
अलोरे, ता. चिपळूण येथे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते या ३३ घरांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
*कसा झाला पुनर्वसनाचा प्रवास?*
– पहिला टप्पा: सिद्धिविनायक मंदिर न्यास, मुंबई – ५ कोटी निधी – २४ घरे (२०२१ मध्ये लोकार्पण)
– दुसरा टप्पा: ८.८३ कोटी निधी – ३३ घरे (अलोरे – १९, तिवरे – १४)
– प्रत्येक घर: ५८४ चौ. फूट
यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले, “महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वसनाचे हे काम पूर्णत्वाकडे नेताना समाधान वाटत आहे. विस्थापित कुटुंबांना पुन्हा सुरक्षित उभं करण्याचा हा प्रवास आहे.”
यावेळी आ. शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण, संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.





















