मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये (महापारेषण) ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील सर्व परिमंडळात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
सुरूवातीला महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार `हर घर तिरंगा`अभियानाच्या अनुषंगाने महापारेषणमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक . विक्रम कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली व अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा फेरी आणि स्वातंत्र्यदिनाचा जागर करण्यात आला.
याप्रसंगी कार्यकारी संचालक सुनील सूर्यवंशी, पीयूष शर्मा, मुख्य अभियंता जुईली वाघ, किशोर गरूड, अमित नाईक, मुख्य विधी सल्लागार विजय पाटील, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नितीन कांबळे, अधीक्षक अभियंता एकनाथ ढेंगळे, उपमुख्य दक्षता अधिकारी प्रशांत गोरडे, किशोर पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण इंगळे, लोटन वळवी, अश्विनी तेरकर, अनिथादेवी थेवर, सहाय्यक अभियंता अनुराग रांगणकर, ऋतुजा वानोडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
























