Home Trending Now “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।- महात्मा ज्योतिबा फुले

“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।- महात्मा ज्योतिबा फुले

107
0

_”विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।”_- महात्मा ज्योतिबा फुले_

हा फुले वाडा आहे.हे `राज्य संरक्षित स्मारक` आहे. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे.

*याच ठिकाणाहून सुरू झालं:*
१.१८६३ – भारतातील पहिलं `बालहत्या प्रतिबंध गृह`. विधवांना आधार.
२. १८६४ – पुण्यातील `पहिला विधवा पुनर्विवाह`.
३ १८७३ – `सत्यशोधक समाज`. स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाचा आग्रह.

●सध्याचा प्रश्न काय आहे?
जानेवारीत इथे कार्यक्रमांना `बंदी` होती.
जूनमध्ये `पूर्वीपासूनच्या रूढींना परवानगी` मिळाली. त्यामुळे वटपूजन झाले.

पुरोगामी संघटना म्हणतात – “हा विचारांचा अवमान आहे.”
आयोजक म्हणतात – “ही अनेक वर्षांची परंपरा आहे.”

माझा प्रश्न फक्त एकच आहे:
जर हे स्थळ “समतेचे तीर्थक्षेत्र” असेल,
तर इथले सगळे निर्णय `समान निकषाने` व्हावेत का?

चला, या वडाला फुलेंचा अर्थ देऊया.
प्रदक्षिणा मारताना म्हणूया:
_”आमच्या संसारात सावित्रीबाईंसारखी जिद्द,
ज्योतिबांसारखा विवेक आणि समता असो.”                           वडाचं झाड ऑक्सिजन  देतं , तर महिलांनी झाडाला फेर्‍या का मारु नयेत. आणि इथेच फुले दांपत्याना नतमस्तक  होऊन  वारसा चालवण्याचा आशीर्वाद  मागण्यांवर तर अजिबात आक्षेप  असू नये. जुने चांगले ते जपणे , सुधारून पुढे जाणे आवश्यक आहे. कोण कोणत्या पक्षाचे याचा संबंध असूच नये.

तुमचं मत कमेंटमध्ये मांडा 👇

#समतेचे_वटपूजन #फुले_वाडा #सत्यशोधक #समान_निकष #शीतलहरीशकरदेकर

 

*जय ज्योती जय सावित्री!*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here