Home मुंबई *ओ, वेल्डिंग चष्मेवाला – हलती मान!,हा आपला महाराष्ट्र , महाराष्ट्राची भाषा मराठी,...

*ओ, वेल्डिंग चष्मेवाला – हलती मान!,हा आपला महाराष्ट्र , महाराष्ट्राची भाषा मराठी, अभिमान मराठी, व्यवहार भाषा मराठीच!*

13
0

*’इधरपे रहना कमाना, तो मराठी बोलनाईच पडेंगा!*’

*मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,* *अभिमान वाटला, मराठी माय आणि मावशी हिंदी हे आपण प्रेमाने म्हणत आलो.*
*पण हिंदी भाषिकांनी पुतना मावशी सारखं वागू नये हे ही तितकेच खरे.*
*अहो, आमच्या १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन अखंड महाराष्ट्र मिळवलाय.*
*कर्नाटकात आमचा बेळगावआणि इतर प्रांत असेच भाषिक वर्चस्वानेआणि परिसर ताब्यात घेऊन कन्नड वर्चस्व वाढवले गेले.*
*आता मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात इतर भाषिक, लोकांचे वर्चस्व व दादागिरी वाढलीय.*
*टॅक्सी रिक्षा युनियन वाले प्रवाशांची अडवणूक कशी करतात ते पहात नाही.*
*आपल्या संघटना वाढवण्यासाठी कोणकोणत्या कलाकुसर करतात हाही अभ्यासण्याचा विषय आहे.*
*परवाने कसे मिळवले जातात आणि ते मिळवून इथेच स्थायिक झालेले चालक मालक महाराष्ट्राशी समरस झालेत का? तर उत्तर बहुसंख्येने नाही असेच उत्तर येईल.*
*कोरोना काळात हाल होत असताना आपल्या राज्यात परत जात असताना या सगळ्यांना आधार दिला.काळजी घेतली महाराष्ट्राने.*
*उत्तर प्रदेशात प्रवेश करणाऱ्यांवर अमानुषपणे होलसेल सॅनिटायझर फवारे मारले गेले शुध्दीकरणासाठी ! सगळं विसरले काय?*
*महाराष्ट्र,मुंबई सगळ्यांना सामावून घेतो याचा अर्थ कोणा राजकीय पक्षाच्या पाठिंब्यावर इथे थैमान घालू लागलेत तर कसं खपवून घेतले जाणार?*
*ना. प्रताप सरनाईक यांनी योग्य वेळी अचूक निर्णय घेतला आहे. त्यांचा निर्णय हा सरकारचा निर्णय असायला हवा.*
*पण त्यांच्या शिवसेनेतील संजय निरुपम हेच याविरोधात कसे काय उभे राहिले?*
*आणि मुळात या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणे आवश्यक होते व आहे !* *आता तर महाराष्ट्रात निवडणूका नाहीत*
*मग महाराष्ट्र आणि स्थानिकांच्या हितासाठी जे होत आहे त्याला नियोजनबद्ध सहकार्य करणे, कायदा सुव्यवस्था राखणे हे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे काम नाही का?*
*खरात फाईल्स तपास सुरु, महिला आरक्षणावरून वेगळे विषय सुरु त्यात ‘कोण होता शिवाजी?’ या काही वर्षापुर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावरून वाद…ही आगीत तेल ओतण्याचे कामं का होत आहेत?*
*मूळात ‘शिवाजी म्हणतो ‘ हा खेळ लहानपणी बहुसंख्य लोक खेळले असतील.पण शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान कुठेही नसताना संजय गायकवाड मधेच का उचकले?*
*मग सगळे प्रकाशकाला न्याय द्यायला भले भले मैदानात आलेत.*
*काय विषय काय चाललंय आता ब्रम्हदेवही सांगू शकत नाही , इतका निर्बुद्ध सत्ताकारणाचा बाजार इथे मांडला जातोय.*
*लोकांचं जगणं सुकर करणं हे सरकारचं लोकप्रतिनिधींचा काम! पण इथे घडतंय भलतच.*
*एसटी आंदोलनाच्या वेळी ते वेल्डिंग चष्मेवाले एड गुणवर्ते किती वैचारिक हैदोस घालत होते?*त्यांचे बिग बाॅस कोण हेही सगळे जाणून आहेत.*
*आता रिक्षा-टॅक्सी* *चालकांना मराठी भाषा सक्तीवरून वेल्डिंग चष्मा आणि मानहलवी डाॅल शड्डू ठोकून उतरलेत.*
*रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संपावेळी मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू,*
*असा इशारा देणाऱ्या अमित ठाकरे यांची गुणरत्न सदावर्ते यांनी खिल्ली उडवली, काय भाषा काय रोष? ” राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू… अमित ठाकरे हवालदार झालेत का?” हे बोलणे म्हणजे बुध्दीमत्तेचा कळसच!तुम्ही हवालदार झाला आहात की आरटीओचे शिपाई झाला आहात? अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का, असा सवाल यांनी उपस्थित केला.*

*यावेळी गुणवर्ते यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावर टीका केली. रिक्षाचालकांना रिक्षावाला नाही, रिक्षावाले साहेब बोला. कोणी कुठे राहावं आणि कुठे पोट भरावं हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या पोटाच्या भरतीसाठी ईडी यंत्रणा लागतात का? माहिती नाही. मात्र, कष्टकरी मेहनत करतात. प्रताप सरनाईक यांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरु नये.* *शिवसेनेतील लोक सरनाईक यांच्या बाजूने नाहीत. संजय निरूपमही परिवहन खात्याच्या निर्णयाविरोधात बोलले आहेत. हिंदी, मराठीवरुन काही लोकं *इतरांना त्रस देऊ इच्छितात. मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर मारहाणीची भाषा करणारे नेते किती जणांच्या घरी जातात? आम्ही कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत. त्यांच्यावर कोणीही हात उचलायचा नाही. अन्यथा कोणीही सुटणार नाही, असा इशाराही हे देतात.*
*इथे मनसे आणि हे गुणवर्ते यात वाद सुरु झालाय… मनसेला राजकीय स्पेस मिळणार आहेच.*
*पण मग सरकारमधील सर्व सहकारी किमान त्यांचा पक्ष, मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का गप्प आहेत? त्यांनी तर ठाण्यात रिक्षा चालकांची संघटन बळकटीसाठी काम केलं होतं.*
*मराठी अस्मिता विषय त्यांनी ऑप्शन ला टाकला आहे की त्यांनाही सोईनं बोलायचं नाही?*
● *विषय ऐरणीवर आलाय आता तो सुटायला हवाच!*
*या मराठी भाषा येण्याच्या निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी तीव्र विरोध केला असून *गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या कष्टकरी जनसंघाच्यावतीने ट्रान्सपोर्ट कमिशनर यांच्या कार्यालयात धडकी दिली. तसेच, प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला विरोध करत संबंधित अधिकाऱ्यांस निवेदनही दिले. महाराष्ट्र तसेच देशभरात१ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक, सामाजिक किंवा प्रशासकीय त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा दिवशी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी कोणतीही बेकायदेशीर, संविधानविरोधी किंवा कायद्याविरोधी विधाने व कृती करणे ही गंभीर बाब आहे, असे म्हणत गुणवर्ते यांनी ट्रान्सपोर्ट आयुक्तांना रॅपिडो आणि रिक्षाचालकांच्यावतीने निवेदन दिले.*
*आंदोलकांच्या मागण्या काय आहेत तरभाषेची सक्ती करण्यासंदर्भात कोणतीही बेकायदेशीर कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी.चालकांच्या बॅज/लायसन्स संदर्भात ड्यु प्रोसेस शिवाय कोणतीही कारवाई होणार नाही* *याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत. माध्यमांमध्ये पसरत असलेल्या भ्रामक व *बेकायदेशीर विधानांबाबत प्रशासनाने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी.१ मे पासून कोणत्याही चालकावर अन्यायकारक किंवा बेकायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री द्यावी.*

● *या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘मराठी ज्ञान अनिवार्य ‘विषय पुढे आलाय.*
*महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वाहतूक विभागाने चालकांसाठी मराठी भाषेचे ‘व्यवहारिक ज्ञान’ सक्तीचे करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. म्हणजे रिक्षा-टॅक्सी-कॅब चालवायची असेल तर मराठी समजली पाहिजे, बोलता आली पाहिजे. हे थोडे सौम्य पण कायम परिणाम होईल असे पाऊल उचलले आहे.*
● *यासाठी ३ नियम बदलणार आहेत*
*सार्वजनिक सेवा वाहन परवाना देताना फक्त चारित्र्य, ड्रायव्हिंग स्किल पुर्वी बघत होते.आता मराठीचे ‘वर्किंग नॉलेज’ आहे का ते तपासणार. पास झालात तरच परवाना मिळेल.*
*नियम ७८ नुसार मीटर टॅक्सीच्या परवान्याच्या अटीत अतिरिक्त अट ही की, चालकाला मराठी येणे *बंधनकारक होणार आहे.*
*तर नियम ८५ नुसार ऑटोरिक्षा परवान्याचे नूतनीकरण करताना मराठीचे ज्ञान दाखवावेच लागेल. नाहीतर परवाना रिन्यू होणार नाही.*
*’वर्किंग नॉलेज’ म्हणजे काय? तर व्याकरण नको, शुद्धलेखन नको. प्रवाशाला ‘दादरला जायचंय’, ‘किती झाले मीटर?’, ‘पुढच्या सिग्नलला डावीकडे घ्या’ हे समजले पाहिजे आणि मराठीत उत्तर देता आले पाहिजे. साधा बेसिक संवाद येणे अपेक्षित आहे.*
*रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी, ओला-उबेर सारख्या ॲप बेस्ड कॅबचे ड्रायव्हर असतात .यांना परवानगी देतानाच मराठी भाषेची चाचणी होईल.*
*जे जुने चालक आहेत त्यांचा दर ३ वर्षांनी परवाना रिन्यू करताना मराठी येते का ते तपासणार. नाही आली तर रिन्यू होणार नाही.*
*उत्तर प्रदेश, बिहार , कर्नाटकातून येऊन मुंबई-पुण्यात रिक्षा चालवणाऱ्यांना आता मराठी शिकावीच लागेल.*
● *सरकारचा यामागचा तर्क काय आहे तर*
*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या* *म्हणण्यानुसार ‘प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी’ मराठी भाषा येणे आवश्यक आहे.*
*उदा: परप्रांतीय चालकाला ‘स्टेशनला सोड’ असं सांगितले, आणि चालकाला कळलेच नाही, भांडण झाले. वयस्कर लोकांना* *हिंदी-इंग्रजी जमत नाही. मग यावर तक्रारी येतात. मराठी सक्ती केली की ‘आपलेपणा’ वाढेल, सेवा चांगली होईल.ही या मागची भूमिका आहे.*
*सध्या आयुक्तांनी प्रस्ताव गृह विभागाला दिला.*
*मसुदा अधिसूचना गॅझेटमध्ये येईल. नागरिक, युनियन, Ola-Uber यांना हरकती/सूचना द्यायला ३० दिवस दिलेत.*
*नंतर आलेल्या सूचनांचा विचार करून फायनल अधिसूचना. मग आर टि ओ मध्ये अंमलबजावणी सुरू होणार आहे.*
*याचा साध्या भाषेत अर्थ की नियम ताबडतोब लागू होणार नाही अजून २-३ महिने लागतील.*
● या सगळ्याचे परिणाम काय होतील?●
*याचा विचार करताना याचे फायदे काय होणार आहेत तर आपल्या मराठीचा व्यवहारिक भाषा म्हणून उपयोग वाढेल. आणि ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी ज्यांना हिंदी येत नाही त्यांना दिलासा मिळेल. ‘भैया, जरा धीरे’ ऐवजी ‘दादा, जरा हळू’ म्हणता येईल.सार्वजनिक ठिकाणी मराठी ऐकू येईल. ‘मुंबईत मराठीच संपली’ ही ओरड कमी होईल.’पत्ता कळला नाही’ वरून होणारी भांडणे टळतील. महत्त्वाचं म्हणजे परप्रांतीय लोकांच्या नावाने त्यांचे नेते बनलेल्या टुकारांचे महत्त्व कमी होऊ लागेल.*
*मराठी माणूस मुंबई महाराष्ट्र हा कोणालाही लाथाळी नाही , पण आम्ही नसून तर मुंबई चालणार नाही हा अंहजार व माज इथे उतरला जाईल.*
*जगायचंय , कामधंदा करायचा की नको तिथे काड्याचे पक्षीय राजकारण करुन इथल्या स्थानिकांना त्रास द्यायचा?*
*हे असले धंदे आणि धुसफूस बंद कशी करायची ते संवेदनाशील समजुतदार मराठी बंधू भगिनींना माहिती आहे.*

● *आता या विषयावर आक्षेप व धोके काय आहेत ते पाहू;२०-२५ वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवणारे परप्रांतीय चालक ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक असेल तर आता मराठी शिकणे कठीण आहे असं म्हणताहेत.मग परवाना रद्द झाला तर त्यांच्या कुटुंबाचे काय?*
*राज्यघटना अनुच्छेद १९(१)(जी) नुसार ‘कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार’. भाषेच्या अटीवर रोजगार नाकारता येतो का? यावर कोर्टात केस पडू शकते.(नाहीतरी असे काही वकिल आहेत की* *प्रसिध्दीसाठी ते फुक्कट वकीलपत्र घ्यायला तैयार असतात. इथे तर वेल्डिंग चष्मा नि हलती मान उत्साहाने मोठ्या पाठबळावर मैदानावर उतरवले गेलेत.*
*आर टि ओ मध्ये ‘मराठी टेस्ट पास’ चा शिक्का मारायला ५००-१०००रु. एजंट मागतील, अशी भीती युनियनने व्यक्त केलीय*
*६०% चालक परप्रांतीय.* *त्यांनी संप केला तर शहर ठप्प होऊ शकते. २०१७ला ‘मराठी पाटी’ सक्तीवरून वाद झाला होता.*
*इतर राज्यांचा विचार केला तर कर्नाटकने २०१६ ला ‘कन्नड शिकणे सक्तीचे’ केले होते, पण हायकोर्टाने स्टे दिला. तामिळनाडूत ऑटोवाल्यांना तामिळ येतेच. गुजरातमध्ये असा नियम नाही. म्हणजे महाराष्ट्राचा निर्णय सर्वात कडक ठरेल.*

*परिवहन विभाग म्हणतोय “महाराष्ट्रात राहायचं, व्यवसाय करायचा, तर मराठी बोललीच पाहिजे”*
*विरोधक म्हणतील’भाषेच्या नावाने गरीबाच्या पोटावर पाय’*
*पुढचे ३० दिवस हरकती-सूचना पाठवायची मुदत दिली आहे.* *रिक्षा-टॅक्सी युनियन, प्रवासी संघटना काय भूमिका घेतात यावर अंतिम स्वरूप ठरेल. कुणाला या मसुद्यावर हरकत नोंदवायची असेल तर ‘आयुक्त, परिवहन, मुंबई’ यांना ३०दिवसात पत्र द्यावे*
*मराठी माणसांनी आणि येथील नागरिकांना या विषयातील मुख्य पैलू विचारात घ्यायला हवेतच!*
*मराठी सक्ती करण्यामागील भूमिका*
*सांस्कृतिक वारसा टिकवणे हा आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे. नवीन पिढीला राज्याच्या समृद्ध साहित्याची आणि *इतिहासाची ओळख व्हावी, यासाठी शिक्षण क्षेत्रात ती अनिवार्य केली गेली आहे.*
*महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला स्थानिक भाषा अवगत असल्यास दैनंदिन व्यवहार, सरकारी कामे आणि स्थानिक लोकांशी संवाद साधणे सोपे होईल. सरकारी कार्यालयांमध्ये कागदपत्रे आणि कामकाज प्रामुख्याने मराठीत चालते. त्यामुळे ही भाषा माहित असणे नागरिकांच्याच फायद्याचे ठरते.*
*महाराष्ट्रातील स्थानिक नोकऱ्या किंवा *व्यवसायांमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे एक महत्त्वपूर्ण साधन ठरेल.*
*तेव्हा इथे कोणताही* *राडारोडा चालणार नाही.*
*समजुतीने घ्या, जगणं सुंदर होईल!*
*जय महाराष्ट्र, जय कामगार , जय मराठी!*
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here