Home मुंबई *आगामी निवडणुका अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढायच्या असून आपण आपल्या पक्षाचे काम उत्तम पध्दतीने...

*आगामी निवडणुका अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढायच्या असून आपण आपल्या पक्षाचे काम उत्तम पध्दतीने करुन उत्कृष्ट यश मिळवुया -खा. सुनिल तटकरे*

92
0

*अंबरनाथमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का ;सदामामा पाटीलांनी हाती बांधले घड्याळ…*

मुंबई दि. ७ ऑक्टोबर – “येणार्‍या निवडणूका अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढायच्या आहेत पण आपण आपल्या पक्षाचे काम उत्तम पध्दतीने करुन उत्कृष्ट यश मिळवुया.” असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

अंबरनाथ येथील शरद पवार गटाचे नेते सदामामा पाटील यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. याशिवाय यवतमाळ, रायगड जिल्ह्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही यावेळी प्रवेश केला.
“पक्ष प्रवेश करणार्‍या लोकांच्या मनात सन्मानपूर्वक वागणूक मिळेल याचा आत्मविश्वास निर्माण होतो याचाच अर्थ आपली पक्ष संघटना राज्यात चांगले काम करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जे तुम्ही ठरवाल त्याच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी राहिल. पक्ष संघटना पाठीशी राहिली की कामाची पद्धत आणि व्याप्ती वाढत असते .” असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

अंबरनाथ येथील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन पाटील, महिलाध्यक्ष पुनम शेलार, युवती अध्यक्ष गौतमी सुर्यवंशी आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता.
याशिवाय यवतमाळमधील विदर्भ मुस्लिम संघटना अध्यक्ष भाई अमन,अल्पसंख्याक विदर्भ नेते मतीन तमन्ना, लायन ग्रुप अध्यक्ष जितेंद्र फडके, उपाध्यक्ष रविशेठ शेळके, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस अमरराजे वामन आदींसह परभणी, रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी जाहीर पक्षप्रवेश केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आ. शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष क्रांती धोटे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, यवतमाळ शहराध्यक्ष लाला राऊत आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here