Home Uncategorized *देशविरोधी बोलणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणार*

*देशविरोधी बोलणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणार*

67
0

*शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांचा इशारा*

*नेपाळमधील हिंसाचारावरुन भारतातही हिंसा भडकवण्याचा राऊत यांचा प्रयत्न*

मुंबई

“नेपाळमध्ये सुरु असलेला हिंसाचार भारतात देखील होऊ शकतो, अशा प्रकारची देशविरोधी भाषा बोलणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांनी २४ तासांत माफी मागावी नाहीतर गुन्हा दाखल करणार.” असा इशारा शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निरुपम म्हणाले की, “संजय राऊत यांनी सोशल मिडियावर नेपाळमधील हिंसाचार भारतात देखील होऊ शकतो, अशा प्रकारची पोस्ट केली आहे. ही पोस्ट भारतविरोधी असून पोलीसांनी याची दखल घेऊन राऊत विरोधात कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली. यापूर्वीही राऊत यांनी श्रीलंका आणि बांग्लादेशमधील हिंसाचाराच्या घटना भारताशी जोडून देशविरोधी वक्तव्य केली होती. आता नेपाळमधील हिंसाचारानंतर राऊत पुन्हा भारतविरोधात गरळ ओकत आहेत.” अशी टीका निरुपम यांनी केली.
“राऊत यांची भाषा म्हणजे देशद्रोह असून भारतात जनभावना भडकवण्याचे काम ते करत आहेत. भारतात जवळपास ७० लाख ते ७५ लाख नेपाळी राहतात. नेपाळ हिंसाचाराची तुलना करुन भारतविरोधी वक्तव्य करण्याचा कुटील डाव राऊत यांच्याकडून खेळला जात आहे.” असा गंभीर आरोप निरुपम यांनी केला. राऊत यांची भूमिका संविधान आणि लोकशाही विरोधी असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि आघाडीच्या पराभवाबाबत निरुपम म्हणाले की, “या निकालातून एनडीएमध्ये एकजूट तर इंडि आघाडीमध्ये फाटाफूट दिसून आली. निवडणुकीपूर्वी इंडि आघाडीने विजयाचे स्वप्न बघितले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांचा पराभव झाला आणि त्यांची मते फुटली. इंडि आघाडीच्या १६ खासदारांनी एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांना मतदान केले. यात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांचा समावेश होता.”असा दावा निरुपम यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here