Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीतही खड्डय़ांचे विघ्न!

विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीतही खड्डय़ांचे विघ्न!

95
0

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सवापुर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा केला होता, पण तो सपशेल खोटा ठरला.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लोकांना खड्डय़ातून मार्ग काढावा लागला.

आयुक्तांच्या घरासमोरील रस्त्याची वाईट अवस्था आहे. जर आयुक्तांच्या घरासमोरील रस्तेच असे असतील, तर शहरातील सामान्य नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यांची काय अवस्था असणार? असा सवाल लोकांकडून विचारला जातोय.
गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ठेकेदारांना तातडीने दुरुस्ती करण्याची सूचनाही देण्यात आली होती.महत्त्वाच बाब म्हणजे, गणेशोत्सवाच्या आधी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी ‘शहर खड्डेमुक्त’ करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी
तातडीने दुरुस्ती करण्याची सूचनाही कंत्राटदारांना दिली होती.
मात्र प्रत्यक्षात हा दावा पोकळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. गणेश मंडळांना आणि नागरिकांना गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच करावे लागले. त्यानंतर आता विसर्जन मिरवणुकाही याच खड्ड्यांतून मार्ग काढताना दिसत आहेत.मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरल्याचे चित्र समोर आले . गणेश मंडळांना आणि नागरिकांना गणरायाचे आगमन खड्डय़ातून करावे लागले. आणि त्यानंतर सर्व विनंती आर्जव करुनही विसर्जन मिरवणुकाही याच खड्डय़ातून वाट काढताना दिसल्या.
पण पावसाने आणि वाहतुकीने या तात्पुरत्या दुरुस्तीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. आयुक्त अभिनव गोयल याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. तरीही त्यांच्या घरासमोरील रस्त्याची ही अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.पण पावसाने आणि वाहतुकीने या तकलादू दुरुस्तीची पोलखोल केली आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. आयुक्त अभिनव गोयल याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. तरीही त्यांच्या घरासमोरील रस्त्याची ही अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात आयुक्तांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी हे खड्डे सिमेंटचे ब्लॉक टाकून तात्पुरते बुजवण्यात आले होते.
गणेश विसर्जनाच्या पवित्र दिवशीही रस्त्यांची ही दुर्दशा कायम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जेव्हा शहराचे प्रमुखच आपल्या घरासमोरील रस्त्याची काळजी घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी शहरातील इतर रस्त्यांवर नियंत्रण कसे ठेवले असेल?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.गणेश विसर्जनाच्या दिवशीही रस्त्यांची ही दुर्दशा कायम असल्याने लोकांमधे प्रचंड संताप आहे. शहराचे प्रमुखच जर आपल्या घरासमोरील रस्त्याची काळजी घेऊ शकत नाहीत, तर त्यांनी शहरातील इतर रस्त्यांवर नियंत्रण कसे ठेवले असेल?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गणेश भक्त आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या या कामावर टीका केली आहे. नागरिकांच्या मते, प्रशासन केवळ आश्वासन देतं. पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नागरिकांचा हा संताप केडीएमसी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. प्रशासन फक्त आश्वासन देते पण तसे काम होत नाही. रस्त्यांची अवस्था आणखीन बिकट होते आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here