नॅशनल हायवे ६६ मुंबई ते गोवा चे नामांतरण दानशूर भक्तिभूषण भागेजी शेठ कीर यांच्या नावे व्हावं!” –
अ.भा. भंडारी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर
“कुडाळ तालुका भंडारी मंडळाचा – कुडाळ भंडारी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा”
कुडाळ, दिनांक : २०जुलै २०२५ रोजी कुडाळ तालूका भंडारी मंडळाचा, कुडाळ भंडारी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना संबोधताना, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची ‘ए आय’ शिक्षण व्यवस्था जिल्ह्यांमध्ये करण्याचे आणि
‘जिल्हा भंडारी भवन’ बांधून देण्याचे आश्वासनही दिले.
त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच
“भंडारी समाज हा नेहमीच आमच्या पाठीशी उभा असतो, भंडारी समाज एकदा वचन दिले की, ती पुर्तता करतो” म्हणताना त्यांनी कालिदास कोळबंकरांचे उदाहरण दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ .भा. भंडारी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपल्या मनोगतात श्रीमान भक्ती भूषण दानशूर भागोजी शेठ कीर यांचे जीवन गाथा थोडक्यात सांगितली त्याचप्रमाणे शूरवीर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख शूरवीर मायनाक भंडारी यांनी गाजवलेला पराक्रम व त्यांनी बांधलेला खांदेरीचा किल्ला बांधताना ब्रिटिशांचा आणि सिद्धीचा पराभव केला, याचे कथन केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एआय सेंटर आणि आयएएस, आयपीएस साठी व्हर्च्युअल क्लासेस सुरू व्हायला हवे, अशी विनंती पालकमंत्री नितेश राणे यांना केली त्या त्याचप्रमाणे नॅशनल हायवे ६६ मुंबई ते गोवा या रस्त्याचा नामांतरण दानशूर भक्तिभूषण भागेजी शेठ कीर यांच्या नावे व्हावं असं निवेदनपत्र मंत्री नितेश राणे यांना दिले.
नामदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना “आपण जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांच्यापर्यंत हा विषय नेतो कारण हा विषय केंद्र सरकारचा आहे उचित कारवाई करून पूर्ण प्रयत्न करीन.” असे सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुका अध्यक्ष अतुल बंगे, मायनाक भंडारींचे वंशज पांडुरंग मायनाक, माजी अध्यक्ष मामा मढीये, माजी अध्यक्ष एकनाथ टेमकर, राजू गवंडे, रत्नागिरी तालुका संघाचे अध्यक्ष राजीव जी कीर व इतर मान्यवर उपस्थित होते.





















